उत्कृष्ट सेवेसाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By Admin | Updated: April 24, 2016 01:53 IST2016-04-24T01:53:26+5:302016-04-24T01:53:26+5:30

नागरी सेवा दिवसानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

Superintendent of staff, felicitation of employees | उत्कृष्ट सेवेसाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

उत्कृष्ट सेवेसाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

गोंदिया : नागरी सेवा दिवसानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रा.रु द्रकार यांनी सेवा हमी कायद्याची माहिती दिली. या कायद्यामुळे जनतेला विहित काळात सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्याला दंड आकरण्याचा अधिकार या कायद्यात आहे. या कायद्यामुळे विहित कालावधीत कार्यक्षमपणे, पारदर्शकतेने सेवा मिळण्यास मदत झाल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात या कायद्याचे महत्व पटवून देतांनाची चित्रिफत दाखिवण्यात आली.
सहायक अधीक्षक किरीमकर यांनी माहितीचा अधिकार या कायद्यावर प्रकाश टाकला. या अधिकारातील तरतूदींची माहिती दिली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नागरी सेवा दिवसाचे औचित्य साधून वन विभागात उत्कृष्ट सेवा देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एस.कदम, टी.व्ही.चन्ने, वनपाल ए.एल.सावळे, आर.एम.वैद्य, एस.एस.रहांगडाले, आर.एस.नागपूरे व गणेश मेश्राम यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्र माला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Superintendent of staff, felicitation of employees