विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:29 AM2021-07-29T04:29:04+5:302021-07-29T04:29:04+5:30

नवेगावबांध : विद्यार्थ्यांनी भारतीय गुरू-शिष्य परंपरेचा अभिमान बाळगून स्वतःचे भविष्य उज्वल करावे. परिश्रमाने यश साध्य होते. गुरुजनांचे आशीर्वाद सदैव ...

Students should make their future bright | विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे

विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे

googlenewsNext

नवेगावबांध : विद्यार्थ्यांनी भारतीय गुरू-शिष्य परंपरेचा अभिमान बाळगून स्वतःचे भविष्य उज्वल करावे. परिश्रमाने यश साध्य होते. गुरुजनांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा आपण यापुढेही सतत कायम ठेवाल, अशी अपेक्षा व्यक्त करून, गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे, असे आवाहन मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णे यांनी केले.

सम्राट अशोक विद्यालय, उमरी येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यालयाचे संस्थापक सचिव आर. एम. भैसारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक एस. व्ही. बडोले, जे. एस. हटवार, एस. ए. नंदेश्वर, के. एम. भैसारे, एम. यु. घरोटे, आर. के. खेडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. एस. पात्रीकर यांनी केले.

Web Title: Students should make their future bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.