विद्यार्थ्यांनी शिस्त व प्रामाणिकपणा बाळगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:32+5:30
आमदार अग्रवाल यांनी, वैभवशाली राष्ट्राची कल्पना आपण नक्कीच करु. कारण अशी शिक्षणसंस्था सुजान आणि बुद्धीमान नागरिकांचा निर्माण करण्यास नेहमी प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे यांनी, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भविष्यात तुमचे मोलाचे योगदान असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. करुणा शेळके यांनी, विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षीत करा की त्यांचे नाव शहरातच नाही तर देशात आणि जगात चमकावे असे मत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी शिस्त व प्रामाणिकपणा बाळगावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वेळोवेळी भारतीय सैन्याने कारगिल सारख्या युद्धात शिस्तबद्ध पद्धतीने शत्रुचा पराभव केला. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा शिस्त व प्रामाणिकपणा बाळगायला हवा असे प्रतिपादन सेवानिवृत्त हवालदार नभिकमल चौधरी यांनी केले.
येथील गोंदिया स्कूलमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. शाळेत आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. विशाल शेळके, डॉ. करुणा शेळके, संस्थाध्यक्ष प्रो.अर्जुन बुद्धे, डॉ. अमित बुद्धे, प्राचार्य जितेंद्र तलरेजा, उपप्राचार्य रीता अग्रवाल, प्राचार्या राखी बिसेन, ज्योती जगदाळे, श्रृती जोशी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, वैभवशाली राष्ट्राची कल्पना आपण नक्कीच करु. कारण अशी शिक्षणसंस्था सुजान आणि बुद्धीमान नागरिकांचा निर्माण करण्यास नेहमी प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे यांनी, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भविष्यात तुमचे मोलाचे योगदान असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. करुणा शेळके यांनी, विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षीत करा की त्यांचे नाव शहरातच नाही तर देशात आणि जगात चमकावे असे मत व्यक्त केले. जगदाळे यांनी, विद्यार्थ्यांनी देशातील छोर पुरूषांचे विचार आपल्या जीवनात अंगीकृत करावे असे मत व्यक्त केले.
पश्चात, विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, नृत्य, पिरॅमिड्स, विविध वेशभूषा आणि भाषणे इत्यादी रंगारंग कार्यक्रम सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंतरशालेय विज्ञान प्रदशर्नीत प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. संस्था सचिव डॉ. इंदिरा सपाटे यांनी एक जबाबदार नागरिक बनून देशसेवेसाठी सज्ज रहावे असे मत व्यक्त केले. संचालन सुस्मीता बिधानी व अर्चना आंबेडारे यांनी केले. आभार विद्यार्थिनी विधी मिश्रा हिने मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.