विद्यार्थ्यांचा आहार जातोय दुसऱ्यांच्याच घशात
By Admin | Updated: September 1, 2016 00:22 IST2016-09-01T00:22:30+5:302016-09-01T00:22:30+5:30
शासनाकडून खाजगी, शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शालेय पोषण आहारात बराच घोळ सुरू आहे.

विद्यार्थ्यांचा आहार जातोय दुसऱ्यांच्याच घशात
आमगाव : शासनाकडून खाजगी, शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शालेय पोषण आहारात बराच घोळ सुरू आहे. ही घोळ करणारी एक साखळीच असून ती कायमची तोडणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.
शासनाकडून जिल्ह्यातील शाळेत वर्ग १ ते ७ व ८ ते १० या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मध्यान्हाला शालेय पोषण आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात वाटप करणाऱ्या एजंसीकडून मोठा घोळ होत आहे. तसेच ही साखळी खालपासून वरपर्यंत कार्यरत आहे. जेव्हापासून शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार शासनाकडून सुरु झाले तेव्हापासून ही चौकडी तयार झाली. यात तांदुळ, तुळदाळ, चनाल वटाणा, तेल मिरची पावडर, राई, जिरे, मिठ, हळद इत्यादीचे वाटप केले जाते. यात एजंसी मोठ्या किराणा दुनाकादाराकडून वरील सामान विकत घेऊन शाळानिहाय वाटप करते. दिलेल्या पोषण आहाराची स्टॉक नोंद वहीत केली जाते. मात्र विद्यार्थ्यामध्ये जो धान्यसाठा वाटप होतो तो संपूर्ण विद्यार्थ्यांना दिल्यानंतरही बाकी राहतो. कारण काही विद्यार्थी येतात व काहींची अनुपस्थिती असते. त्यामुळे दिलेला शालेय पोषण आहार शिल्लक राहतो. मात्र शिल्लक पोषण आहाराची नोंद स्टॉक नोंदवहित केलीच जात नाही.
१० क्विंटल तांदूळ वाटप केल्यानंतर फक्त पाच क्विंटल पोषण आहाराच्या उपयोगात व उरलेले पाच क्विंटल स्टॉक नोंदवहीत दाखविले जात नाही. वाटप केलेले १० क्विंटल खर्च झाल्याची नोंद संबंधित मुख्याध्यापक किंवा ज्याच्याकडे हा अधिकार आहे तो करतो. जेव्हा दुसऱ्यावेळी शालेय पोषण आहार शाळेत येतो तेव्हा आलेल्या शालेय पोषण आहाराच्या गाडीतून उरलेला पांच क्विंटल व नवीन पाच क्विंटल असे दाखवून ते खाण्यासाठी काही पोषण आहार उतरविला जातो. तोच गाडीत आलेला व उरलेला पोषण आहार वाटप करणारी एजंसी विक्री करते. यात एजंसी, मुख्याध्यापक तथा जबाबदारी असणारे शिक्षक तसेच केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी व आणखीही काही अधिकारी सहभागी असल्याची कुजबूज सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)