धडपड करणारा सदैव जिंकतो
By Admin | Updated: January 28, 2015 23:36 IST2015-01-28T23:36:29+5:302015-01-28T23:36:29+5:30
ज्यांना यश आले नसेल त्यांनी भविष्याकरिता प्रयत्न करावे आपल्याला निश्चितच त्याचे फळ मिळेल. कारण धडपड करणारा हा सदैव जिंकतो असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

धडपड करणारा सदैव जिंकतो
काचेवानी : ज्यांना यश आले नसेल त्यांनी भविष्याकरिता प्रयत्न करावे आपल्याला निश्चितच त्याचे फळ मिळेल. कारण धडपड करणारा हा सदैव जिंकतो असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले. तिरोडा तालुक्याच्या करटी (बु.) केंद्रांतर्गत ग्राम बेरडीपार (काचे.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित तालुका क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चतुर्भूज बिसेन होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती बंडू सोनवाने, प्रभू पटले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बंसोड, माजी उपसभापती वसंत भगत, सरपंच प्रकाश ठाकरे, सरपंच गायत्री चौधरी, सुरेश झगेकार, सुखदेव बिसेन, धनराज पटले, जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार उपस्थित होते.
प्रास्ताविक स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे तालुका सचिव के.आर.रहांगडाले यांनी मांडले. यावेळी चतुर्भूज बिसेन, प्रल्हाद जांभूळकर, राजलक्ष्मी तुरकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, शालेय मुलांच्या खेळात किंवा कार्यक्रमात राजकारण आणणे योग्य नसल्याची टिका केली. कार्यक्रमात पक्ष व राजकारण तसेच शिक्षकांवर दडपण आणून कार्य करणे योग्य नसल्याचे सांगीतले. त्यांनी बौध्दीक विकासासोबतच सर्वांगिण विकासात भर पडावी तसेच आरोग्य उत्तम रहावे याकरिता खेळ आवश्यक असल्याचे मत मांडले.
दरम्यान त्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये माध्यमिक मुलांची कबड्डी भजेपार शाळा प्रथम, गुलाबटोला व्दितीय तर प्राथमिक विभागातून प्रथम बेरडीपार (काचेवानी) व व्दितीय मारेगाव शाळेने पुरस्कार पटकाविला. मुलींमध्ये माध्यमिक विभागाचा प्रथम क्रमांक गुमाधावडा, व्दितीय मरारटोला तर प्राथमिक विभागातून प्रथम क्रमांक गोंडमोहाडी व व्दितीय क्रमांक गुलाबटोला शाळेने पटकाविला. खो-खो मध्ये माध्यमिक मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सोनेगाव तर व्दितीय क्रमांक इंदोरा शाळेने तसेच प्राथमिक विभागामध्ये प्रथम क्रमांक अत्री तर व्दितीय क्रमांक गांगला शाळेने पटकाविला.
मुलीच्या स्पर्धेत माध्यमिक विभागातून प्रथम जमुनिया, व्दितीय क्रमांक खडकी शाळेने तर प्राथमिक विभागातून प्रथम क्रमांक अर्जुनी तर व्दितीय क्रमांक बेरडीपार (काचेवानी) शाळेने पटकाविला. सांस्कृतिक कार्यक्रमात माध्यमिक विभागातून डोंगरगाव (प्रथम), परसवाडा (व्दितीय), तसेच प्राथमिक विभागातून डोंगरगाव (प्रथम), नत्थुटोली (व्दितीय) आणि प्रेक्षणीय कवायतीत माध्यमिक स्तरावर बिरसी (प्रथम), बेरडीपार (व्दितीय) तसेच प्राथमिक स्तरातून कवलेवाडा (प्रथम), बिहीरीया (व्दितीय) मानकरी ठरल्या. (वार्ताहर)