शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST2022-04-10T05:00:00+5:302022-04-10T05:00:02+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर ओक) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध शनिवारी (दि. ९) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोंदविण्यात आला. येथील गांधी चौकातील महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर मूक आंदोलन करीत हल्ल्याचा निषेध नोंदविला. यानंतर माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी खा. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहचला. 

Strong protest against the attack on Sharad Pawar's house | शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील (सिल्वर ओक) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध शनिवारी (दि. ९) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोंदविण्यात आला. येथील गांधी चौकातील महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर मूक आंदोलन करीत हल्ल्याचा निषेध नोंदविला. यानंतर माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी खा. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहचला. 
एसटी कामगाराच्या पाठीमागे सदैव उभे राहणाऱ्यांच्या घरावर हल्ला करणारे एसटीचे कामगार होऊ शकत नाही. अशी नाराजी सुध्दा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी जि. प. गटनेते सुरेश हर्षे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, गोंदिया शहर अध्यक्ष अशोक शहारे, युवक काँग्रेस अध्यक्ष केतन तुरकर, युवा नेते रविकांत बोपचे, डाॅ. योगेंद्र भगत, राजू. एन. जैन, सुनील पटले, शैलेष वासनिक, विनोद हरिणखेडे, अविनाश काशीवार, प्रभाकर दोनोडे, नरेश भेंडारकर, रवी पटले, रमन उके, राजेश कापसे, प्रेम जायस्वाल, केवल बघेले, वाय. टी. कटरे, सी.के.बिसेन, नागरत्न बनसोड, अखिलेश सेठ, महेंद्र चौधरी, भृंगराज परशुरामकर, सतीश पारधी, नानू मुदलीयार, भगत ठकरानी, एकनाथ वहिले, चुटे उपस्थित होते. शनिवारी सकाळी ११  वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी  आणि कार्यकर्ते शहरातील गांधी प्रतिमा परिसरात एकत्र आले. त्यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध केला. भर उन्हात त्यांनी ठिय्या आंदोलन करून हल्ल्यामागील मास्टर माईंडला अटक करण्याची मागणी केली. 

एसटी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर केलेला हल्ला हा अंत्यत निंदनीय आहे. या हल्ल्यामागील खऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तरच अशा घटनांची पुनर्रावृत्ती होणार नाही. 
- राजेंद्र जैन, माजी आमदार
नेहमीच एसटी कामगारांच्या पाठीशी राहणाऱ्या खा. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा त्यांच्या विरुध्द रचलेला कट असून या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवितो. अशा घटनांची पुन्हा पुनर्रावृत्ती होऊ नये यासाठी यातील हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. 
- गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष

 

Web Title: Strong protest against the attack on Sharad Pawar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.