शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

जवळ असलेल्या नवेझरी या गावी दरवर्षी आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू होत होते. पण यावेळी दिवाळीचा उत्सव संपला, परिसरात सध्या मंडईची धूम सुरू झाली, शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले,

मुंडीकोटा : जवळ असलेल्या नवेझरी या गावी दरवर्षी आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू होत होते. पण यावेळी दिवाळीचा उत्सव संपला, परिसरात सध्या मंडईची धूम सुरू झाली, शेतकऱ्यांच्या हातात हलक्या धानाचे पीक आले, पण शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न केल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैशाच नाही. त्यामुळे नवेझरी परिसरात त्वरीत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी तिरोडा तालुका शिवसेना उपप्रमुख महेंद्र भांडारकर व शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरातील अनेक गावात जलाशय व कालवे यांच्या सहाय्याने हलक्या धानाची लागवड करण्यात आली. यावर्षी पाऊस अधिक प्रमाणात पडला नसला तरी शेतकऱ्यांनी आपली रोवणी आटोपून घेतली. आता दिवाळी गेली व मंडईला सुरूवात झाली. मंडईतही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. हलके धान विकून पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला. तर आधारभूत धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. हलक्या धानाचा हंगाम विविध रोगांमुळे समाधानकारक नसला तरी खास मंडईनिमित्ताने या भागातील शेतकरी पाऊस आला नाही तरी हलक्या धानाची कापणी व मळणी करून मंडईचा खर्च भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण खर्चाकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे खर्चापोटी शेतकरी धान व्यापाऱ्याला विकत आहेत. व्यापाऱ्याकडे धानाला भाव नाही. व्यापारी फार कमी किंमतीत धान घेवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहेत. यावेळी शेतकरी हा कोंडीत दिसत आहे. पण शेतकऱ्यांचा वाली कुणी दिसत नाही. अनेक समस्या सहन करूनही आता या समस्येला शेतकरी तोंड देत आहेत. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शासनाने नवेझरी येथे आधारभूत धान खरेदी सुरू करण्याची मागणी तालुका उपप्रमुख शिवसेना तिरोडा महेंद्र भांडारकर व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)