शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक फवारणीने कचरा नष्ट होण्याऐवजी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

मात्र यामुळे धानातील कचरा नष्ट होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १० एकरातील धानपीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सदर तणनाशक औषधी तयार करणाऱ्यां कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : औषध निर्माण कंपनीवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : धान पिकातील कचरा होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांने तणनाशकाची खरेदी करुन फवारणी केली. मात्र यामुळे धानातील कचरा नष्ट होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने १० एकरातील धानपीक गमविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे सदर तणनाशक औषधी तयार करणाऱ्यां कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील शेतकरी देवराम कोठुजी अंबुले यांनी आपल्या १० एकर शेतीत धान पिकाची लागवड केली. रोवणी केल्यानंतर शेतात तण कचरा होऊ नये यासाठी शेतात तणनाशक औषधीची फवारणी केली. देवराम अंबुले यांनी गावातीलच अंबुले कृषी केंद्रातून टुफोर्टी-नामिनी गोल्ड तणनाशक मागीतले असता त्यांनी त्याला अ‍ॅसर्ट कंपनीचे तणनाशक दिले.अंबुले यांनी शेतात जाऊन या तणनाशकाची फवारणी केली.आठ दिवस, पंधरा दिवस, महिना लोटला पण शेतातील तण नष्ट झाले नाही. तर धान नष्ट होण्यास सुरूवात झाली. तण वाढल्याने धानपिक दबले गेले व संपूर्ण शेतात धानाऐवजी तण मोठ्या प्रमाणात वाढले.शेतकऱ्याने कृषी केंद्र संचालकांना असर्ट तणनाशकामुळे फायदा न होता नुकसान झाल्याचे सांगितले. पण कृषी केंद्र संचालकांनी यावर कसलेच उत्तर न देता शेतकऱ्याला परतावून लावले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता देवराम अंबुले यांनी या संपूर्ण प्रकाराची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांच्याकडे रितसर तक्रार केली.मात्र अद्यापही याची चौकशी करण्यात आली नाही. गट क्र.२६१, २५९, २५६, आराजी ३.२८ हेक्टर कोदू अंबुले, नंदराम अंबुले व १४५, ४५२/१, ४२१/२ देवराम अंबुले आराजी १ हेक्टर एकूण चार हेक्टर जमिनीत या तणनाशकाची फवारणी केली. त्यांचा लागवड खर्च, बियाणे, खत यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च कृषी केंद्र संचालकाच्या चुकीमुळे व्यर्थ गेला.हाती आलेले पीक सुध्दा वाया गेल्याने बँकेच्या कर्जाची परफेड कुठून करायची, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा असा गंभीर प्रश्न अंबुले यांच्यासमोर निर्माण झाला असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :agricultureशेती