रस्त्यावर थुंकणे पडणार आता महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:18+5:30
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणी थुंकतांना आढळल्यास त्याच्या विरूध्द कलम ११७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. गुन्हा सिध्द झाल्यावर १२०० रूपये दंड करण्यात येणार आहे.

रस्त्यावर थुंकणे पडणार आता महागात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहून त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कडक आदेश काढले आहेत.गोंदिया जिल्ह्यातील सर्व पानठेले बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला १२०० रूपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात गोळा होणाºया गर्दीला थांबविण्यासाठी पानटपरी दुकानांवर तंबाखू, जर्दा, गुटखा, सुपारी, खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे. ह्या पानटपरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणी थुंकतांना आढळल्यास त्याच्या विरूध्द कलम ११७ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. गुन्हा सिध्द झाल्यावर १२०० रूपये दंड करण्यात येणार आहे.
सदर आदेशात नगर परिषद, नगर पंचायतचे मुख्याधिकारी व खंडविकास अधिकारी यांना अधिकार देण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाºया व्यक्ती किंवा संस्थेला भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८ अंतर्गत शिक्षेस पात्र ठरविण्यात येईल.