भरधाव कारची झाडाला धडक; चालक ठार, चार जखमी
By अंकुश गुंडावार | Updated: May 9, 2023 18:08 IST2023-05-09T18:07:30+5:302023-05-09T18:08:36+5:30
Gondia News गोंदियाहून कोहमाराकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या लगतच्या झाडावर आदळली. यात चालकाचा मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले.

भरधाव कारची झाडाला धडक; चालक ठार, चार जखमी
गोंदिया : गोंदियाहून कोहमाराकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या लगतच्या झाडावर आदळली. यात चालकाचा मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.९) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील भुसारीटोला पळसगाव जवळ घडली.
फैजान फारुख शेख (२४) रा. रामनगर गोंदिया असे मृतक कार चालकाचे नाव आहे. तर जखमींमध्ये अखिल पांचालू (२९), समीर नसीर शेख (२६), अंजुम अफरोज शेख (३२), रानू कुरैशी (२८) रा. गोंदिया यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सर्व कुटुंबीय मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोंदियाहून नागपूर येथे जात होते. दरम्यान कोहमारा मार्गावरील भुसारीटोला पळसगाव दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडाला जावून आदळली. यात कार चालक फैजान शेखचा घटनास्थळी मृत्यु झाला. तर कारमधील चार जण जखमी झाले. त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी घेतली आहे.