शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने केले जन्मदात्रीला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

दररोज सकाळी उठवून माझी झोप मोडत असते असे बोलून प्रमोदने रागाच्या भरात बाजूला असलेल्या कुऱ्हाडच्या दांड्याने डोक्यावर वार केला. यात रक्तबंबाळ झालेल्या मीना शेंडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देआमगाव तालुक्यातील बाम्हणी येथील घटना : झोपेतून उठविल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : दररोज झोपेतून उठवित असल्याच्या रागातून मुलाने आपल्या जन्मदात्रीलाच कुºहाडीच्या दांड्याने मारून ठार केले. तालुक्यातील ग्राम बाम्हणी येथे मंगळवारी (दि.२८) सकाळी ६.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. मृत महिलेचे नाव मीना मनीराम शेंडे (५५) असे आहे.तालुक्यातील देवरी रोडवरील ग्राम बाम्हणी येथील आरोपी प्रमोद मनीराम शेंडे (३८) हा नेहमी गोठ्यात पलंग टाकून झोपतो. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२८) सकाळी ६.३० वाजतादरम्यान त्याची आई मीना शेंडे गोठा साफ करण्यासाठी आली व त्याला हाक देऊन उठवू लागली.दररोज सकाळी उठवून माझी झोप मोडत असते असे बोलून प्रमोदने रागाच्या भरात बाजूला असलेल्या कुऱ्हाडच्या दांड्याने डोक्यावर वार केला. यात रक्तबंबाळ झालेल्या मीना शेंडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मीना शेंडे यांचे पती मनीराम शेंडे (५८) यांच्या तक्र ारीवरून आरोपी प्रमोदवर भादंवीच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम काळे करीत आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण होते.

टॅग्स :Murderखून