मुलाने केले जन्मदात्रीला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:34+5:30

दररोज सकाळी उठवून माझी झोप मोडत असते असे बोलून प्रमोदने रागाच्या भरात बाजूला असलेल्या कुऱ्हाडच्या दांड्याने डोक्यावर वार केला. यात रक्तबंबाळ झालेल्या मीना शेंडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

The son killed the mother | मुलाने केले जन्मदात्रीला ठार

मुलाने केले जन्मदात्रीला ठार

ठळक मुद्देआमगाव तालुक्यातील बाम्हणी येथील घटना : झोपेतून उठविल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : दररोज झोपेतून उठवित असल्याच्या रागातून मुलाने आपल्या जन्मदात्रीलाच कुºहाडीच्या दांड्याने मारून ठार केले. तालुक्यातील ग्राम बाम्हणी येथे मंगळवारी (दि.२८) सकाळी ६.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. मृत महिलेचे नाव मीना मनीराम शेंडे (५५) असे आहे.
तालुक्यातील देवरी रोडवरील ग्राम बाम्हणी येथील आरोपी प्रमोद मनीराम शेंडे (३८) हा नेहमी गोठ्यात पलंग टाकून झोपतो. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२८) सकाळी ६.३० वाजतादरम्यान त्याची आई मीना शेंडे गोठा साफ करण्यासाठी आली व त्याला हाक देऊन उठवू लागली.
दररोज सकाळी उठवून माझी झोप मोडत असते असे बोलून प्रमोदने रागाच्या भरात बाजूला असलेल्या कुऱ्हाडच्या दांड्याने डोक्यावर वार केला. यात रक्तबंबाळ झालेल्या मीना शेंडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मीना शेंडे यांचे पती मनीराम शेंडे (५८) यांच्या तक्र ारीवरून आरोपी प्रमोदवर भादंवीच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम काळे करीत आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यात भीतीचे वातावरण होते.

Web Title: The son killed the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून