शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली.

ठळक मुद्देगृहभेटीच्या उपक्रमाला सुरूवात : हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीच्या प्रात्यक्षिकावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, कोव्हीड-१९ विषाणूपासून बचाव व्हावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेची माहिती देत हात धुन्याचे प्रात्यक्षिक देण्याचे कार्य वडेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा नर्सिंग कॉलेजच्या शिक्षिका भाग्यश्री केळवतकर करीत आहेत. यासाठी वडेगाव व परिसरातील गावात त्यानी गृहभेटीच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली. त्यामुळे गर्दी पसरू नये, यासाठी त्यानी ‘एकला चलो रे’ प्रमाणे घरोघरी जावून लोकांना हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन व कोरोना विषाणूबाबत, त्याच्या प्रतिबंधाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची माहिती देण्याचे कार्य सुरू केले. तसेच शिंकतांना व खोकतांना तोंडावर रूमाल घेतला पाहिजे.बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यास हाताद्वारे अथवा एखाद्या वस्तुवर ड्रॉपलेट्स असल्यास नाक, तोंड व डोळ्याद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. कोणत्याही वस्तुला हात लावल्यावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास साबणाने तांत्रिक पद्धतीने हात धुन्याचे मार्गदर्शन भाग्यश्री या नित्यनेमाने करीत आहेत. कोणताही ताप अथवा सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे, डॉक्टरांकडे जाताना आपण आजारी असल्यास इतरांना संसर्ग होवू नये म्हणूनच मास्क वापरावे, अथवा मास्क वापरू नये असा सल्ला गावकऱ्यांना देत आहे. दरम्यान आपली रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.त्यासाठी सकस आहार घेण्याचा सल्ला गृहभेटीतून त्यात देत आहेत. शासनाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच संपूर्ण देशात कलम १४४ लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरातच राहावे, गर्दीच्या ठिकाणात जाण्याचे टाळावे तथा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या