शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

गोंदिया जिल्ह्यातील शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:23 IST

देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेचे स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लॉस्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविद्यार्थी थोडक्यात बचावलेतीन दिवसात दुसरी घटनाशाळेच्या इमारती जीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेचे स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लॉस्टर कोसळल्याची घटना सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने याच वेळेत विद्यार्थी जेवणासाठी वर्गखोली बाहेर गेले असल्याने मोठी जिवीत हानी टळली. तीन दिवसात लागपोठ घडलेल्या दोन घटनांमुळे जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.प्राप्त माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा असून पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असून एकूण १११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उन्हाळा असल्याने शाळा सकाळीत भरविली जात आहे. गुरूवारी (दि.२८) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास विद्यार्थी जेवणासाठी शाळेच्या आवारात बसले होते. याच दरम्यान इयत्ता सातव्या वर्गाच्या खोलीचे स्लॅबचे प्लास्टर कोसळून पडले. मोठा आवाज झाल्याने शिक्षकांनी वर्गखोलीत जावून पाहिले असता स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग पडलेला आढळला. त्यानंतर लगेच त्यांनी विद्यार्थ्यांना त्या वर्ग खोलीत न बसण्याची सूचना दिली. तसेच केंद्रप्रमुख व गोरेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना याची माहिती दिली. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बांधकामावर प्रश्नचिन्हसटवा येथील जि.प.शाळेच्या इमारतीचे बांधकाम आठ ते दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र अल्पावधीत स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने इमारत बांधकाम आणि त्यात वापरलेल्या साहित्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.गुणवत्तेकडे दुर्लक्षइमारतींचे बांधकाम करताना जि.प.शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाचे सुध्दा लक्ष नाही. केवळ कंत्राट देऊन मोकळे होण्याच्या भूमिकेमुळे जि.प.शाळा इमारत बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतला आॅगस्ट महिन्यात पत्र दिले होते. मात्र अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. शाळेची इमारत जुनी नसून आठ ते दहा वर्षांपूर्वीच बांधण्यात आली आहे.- एन.सी.बिजेवार, मुख्याध्यापक, जि.प.शाळा सटवाशाळेच्या इमारतीचे बांधकाम आठ दहा वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. इमारत जीर्ण देखील झालेली नाही. अल्पावधीत स्लॅबचे प्लॉस्टर कोसळल्याने याची माहिती जि.प.शिक्षण विभागाला देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येईल.- चंद्रशेखर भगत, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सटवा.

टॅग्स :Schoolशाळा