सहा शाळाबाह्य मुलांना केले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST2019-09-02T06:00:00+5:302019-09-02T06:00:18+5:30

एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले.

Six schoolchildren enrolled | सहा शाळाबाह्य मुलांना केले दाखल

सहा शाळाबाह्य मुलांना केले दाखल

ठळक मुद्देशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले: शिक्षणासाठी वह्या व पुस्तके दिली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजुरी करणाºया बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तिरोडा तालुक्यातील परसवाडा केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्राम अर्जुनी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत सहा शाळाबाह्य मुलांना दाखल कण्यात आले आहे.
एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये त्यासाठी तजविज केली. तसेच स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे हे नमूद केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे.
कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना शोधण्याचा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात कुडवा, रेल्वेस्थानक, काचेवानी, मुंडीकोटा, सौंदड येथे भीक मागणाºया, मांग-गारुडी, लोहार, फिरणारे नाथजोगी यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहेत. शाळाबाह्य मूलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागासमोर ‘शाळाबाह्य मूल दाखवा एक हजार रूपये मिळवा’ असे जनजागृती करणारे फलकही लावले आहे. शिक्षकांनीच शाळाबाह्य मूल शोधण्यासाठी प्रयत्न केलेत. नाथजोग्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना शाळेत दाखल करण्यात आले. रविंद्र श्रावण माळवे याला सातवीत, अंकुश श्रावण माळवे याला पाचवीत, सुरेखा नशीब शिंदे ही ११ वर्षाची आहे. चांदणी हंसराज बाभूळकर दुसरीत, काजल प्रकाश माळवे तिसरीत तर साजन हंसराज बाभूळकर याला पहिलीत दाखल करण्यात आले. त्यांना वह्या व पुस्तका भेट देण्यात आल्यात.

Web Title: Six schoolchildren enrolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.