साहेब, आम्हाला गावाला जाऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:32+5:30
तेलगंणा राज्यातून गोदिया येथे शेती विषयक अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी मोठया प्रमाणावर युवक गोदिया येथे आले होते. एका खासगी मार्केटिंग कंपनीत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या युवकांनी सुरूवातीला दोन चार दिवस स्वत:ची जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुढे हाताला काम नाही खिशात पैसे नाही. पोट भरावे कसे या विवंचनेत असलेल्या त्या युवकांनी घराची वाट धरली.

साहेब, आम्हाला गावाला जाऊ द्या
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : कोरोनामुळे जगण्यातले संदर्भ बदलले आणि गावाच्या ओढीने सारेच मजूर गावजवळ करू लागले. यातच दीडशे युवकांचा एक जत्था गोंदियावरून गोरेगाव मार्ग तेलंगणाला जाण्यासाठी निघाला पण रात्रीच पोलिसांनी गोरेगावात त्यांना अडवून त्या युवकांना क्वारंटाईन केले. याला आता एक महिण्याचा कालावधी लोटूनही त्या युवकांना प्रशासनाने न सोडल्यामुळे ते युवक आता आम्हाला गावाला जाऊ द्या हो असा टाहो फोडत प्रशासनाला हात जोडत गावी सोडून द्या, आई वडील खूप रडतात अशी भावनीक घालत आहेत.
तेलगंणा राज्यातून गोदिया येथे शेती विषयक अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यापूर्वी मोठया प्रमाणावर युवक गोदिया येथे आले होते. एका खासगी मार्केटिंग कंपनीत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या युवकांनी सुरूवातीला दोन चार दिवस स्वत:ची जेवणाची व्यवस्था केली. मात्र पुढे हाताला काम नाही खिशात पैसे नाही. पोट भरावे कसे या विवंचनेत असलेल्या त्या युवकांनी घराची वाट धरली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी कायदा लागू करण्यात आली आहे.त्यामुळे सर्वत्र वाहतूक बदं करण्यात आली. रेल्वे बसेस बदं करण्यात आले. या परिस्थितीत त्या युवकांनी मिळेल त्या साधनाने घराची वाट धरली. ३१ मार्चला गोदियावरून गोरेगावात दाखल होताच पोलिसांनी त्यांना अडविले आणि त्या युवकांची गावाकडे जाण्याची आशा धुसर झाली. त्या सर्व युवकांना येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
गोरेगाव शहरात दीडशे युवकांचे जत्थे स्थानिक जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन होताच शहरांतील दानविर, सामाजिक संघटना, धावून आल्या त्या दीडशे युवकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. पुढे तेरा दिवस खालसा सेवा दलने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. सध्या नगर पंचायततर्फे नास्ता,चहा व जेवणाची व्यवस्था करीत आहे.
युवकांना झोपण्यासाठी बेड, पंखा, आंघोळीसाठी पाणी या सर्व गोष्टींची व्यवस्था नगर पंचायत आणि संबधित विभागाने वेळीच केलीे. पण ३५ दिवसांचा कालावधी लोटल्यामुळे गावाकडील आठवनीने आसुसलेले युवक काहीही ऐकण्यास तयार नाही. त्याचा उद्रेक सोमवारी (दि.४) झाला. गावी जाऊ द्या चा टाहो फोडत मोठया प्रमाणावर युवकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच तहसीलदार नरेश वेदी व पोलिसांनी त्या युवकांना तेलगंणा प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे सांगत परवानगी मागितली असल्याचे पत्र दाखिवले. काही वेळ युवकांनी रस्त्यावर बसून गोंधळ घालून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने त्या युवकांना तेलगंणा राज्यात पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून बुधवारी त्यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.