शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशावर बोगस स्वाक्षरी करून ग्रामसेवकाने केली उचल

By admin | Updated: January 27, 2015 23:35 IST

तालुक्यातील चिल्हाटी येथील तत्कालीन ग्रामसेवक एच.आर. शहारे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व मागासक्षेत्र विकास निधीमधून स्वत:च्या नावे परस्पर

गोरेगाव : तालुक्यातील चिल्हाटी येथील तत्कालीन ग्रामसेवक एच.आर. शहारे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व मागासक्षेत्र विकास निधीमधून स्वत:च्या नावे परस्पर निधी काढून स्वत:च्या कामात खर्च केले, अशी तक्रार चिल्हाटीचे सरपंच देवराम रहांगडाले यांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया, खंडविकास अधिकारी गोरेगाव यांना केली आहे. चिल्हाटीचे सरपंच देवराम रहांगडाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन ग्रामसेवक एच.आर.शहारे यांनी धनादेशावर बोगस स्वाक्षरी करून ग्राम पंचायतच्या विविध फंडातील पैसे विड्राल करून स्वत:च्या कामात खर्च केले व काही दिवसानंतर विड्राल केलेली संपूर्ण रक्कम परत ग्रामपंचायत जमा खातेमध्ये जमा केले. सदर प्रकरण ग्रामपंचायतच्या लक्षात आल्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने चौकशी केली असता सदर प्रकार लक्षात आला. ग्रामसेवकाने जवळपास ५ लाख ५० हजार रुपये काढून स्वत:च्या कामात खर्ची केल्याचे व परत एक वर्षाच्या कालावधीत काढलेली संपूर्ण रक्कम जमा केल्याची तक्रार सरपंच देवराम रहांगडाले यांनी केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन ग्रामसेवक एच.आर. शहारे यांच्यावर कारवाईची मागणी सरपंचासह गावकऱ्यांनी केली आहे. यावर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही. (तालुका प्रतिनिधी)