शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा जोडधंदा झाला उदरनिर्वाहाचे मुख्य साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतकरी भूवन सिताराम पाथोडे यांनी गोंदियातील एका सामाजिक संस्थेत १७ वर्ष काम केले. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडत नसल्याने त्यांनी ती नोकरी सन २०१२ ला सोडली. नोकर म्हणून काम करताना आमगाववरून रेल्वेने सकाळी गोंदियाला येणे परत रात्री उशीरापर्यंत घरी जाणे या रोजच्या प्रकाराने ते कंटाळले होते.

ठळक मुद्देदुसऱ्यांना देतो रोजगार : शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एका बहुउद्देशिय विकास संस्थेत तुटपुंज्या मानधनावर नोकरी करणाºया तरूणाने नोकरीचा नाद सोडून मालक होण्याचे स्वप्न बाळगले. परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरूवातीला शेतीचा आधार घेतला. शेतीला जोडधंदा म्हणून केलेल्या दुधाच्या व्यवसायातून त्याने आर्थिक प्रगती साधली. परिणामी नोकर म्हणून काम करण्यापेक्षा त्याने मालक म्हणून काम करणे पसंत केले.आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतकरी भूवन सिताराम पाथोडे यांनी गोंदियातील एका सामाजिक संस्थेत १७ वर्ष काम केले. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडत नसल्याने त्यांनी ती नोकरी सन २०१२ ला सोडली. नोकर म्हणून काम करताना आमगाववरून रेल्वेने सकाळी गोंदियाला येणे परत रात्री उशीरापर्यंत घरी जाणे या रोजच्या प्रकाराने ते कंटाळले होते. शेवटी वडिलोपार्जीत शेतीत आपल्या शिक्षणाचा फायदा व्हावा, आपण नोकर म्हणून काम करण्यापेक्षा मालक म्हणून स्वत:च्याच शेतीत काम करण्याचा चंग बांधला.शेतीच्या कामाला सुरूवातही केली. परंतु महिन्याकाठी खिशात येणारे पैसे शेतीत दर महिन्याला मिळत नसल्याने ते थोडे निराश झाले. परंतु दररोज किंवा महिन्याकाठी तरी पैसे खिशात यावे यासाठी त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करण्याचे ठरविले. म्हशी घेऊन त्यांना शेतातून चारून घरी आणणे, त्यानंतर आमगाव येथे जावून दूध विकण्यास सुरूवात केली. भूवन पाथोडे यांच्याकडे आजघडीला पाच म्हशी व दोन गाई आहेत. ही सात दुभती जनावरे दिवसाकाठी ४० लीटर रूपये दूध देतात. जनावरांपासून काढलेल्या दूधात कसलीही भेसळ नाही. त्यामुळे एका लिटरमागे ४० रूपयाने दूध लोक सहज खरेदी करतात. यातून त्यांना १६०० रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पत्करलेल्या हा दूध व्यवसाय त्यांच्या उपजिवीकेचा मुख्य साधन झाला.शेतीचे उत्पन्न झाले बचत बँकपारंपरिक धानाच्या शेती बरोबरच भाजीपाल्याची शेती देखील ते करतात. यंदा त्यांनी २ किलो वजनाच्या मुळ्याचे त्यांनी आपल्या शेतीत उत्पादन घेतला. वांगी, टोमॅटो, कांदे असे विविध भाजीपाला ते शेतातून घेतात. सोबतच रब्बी व खरीप अशी दोन पिके ते सहा एकर शेतीतून घेत असतात. दुधातून येणाºया मिळकतीतून घर चालविणे व शेतीतून येणाºया पैश्यातून शेती खरेदी करणे, लग्नसमारंभ, मुलांचे शिक्षण व उर्वरीत पैसे बचत म्हणून बँकेत जमा करतात. शेतीच्या कामासाठी ते गावातीलच काही लोकांना रोजगारही देतात. नोकरीचा नाद सोडून स्वत: मालक बनण्याचे स्वप्न पाहणारे भुवन पाथोडे आज गावात आदर्श शेतकरी म्हणून ओळखल्या जात आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी