शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने रात्री 9 वाजता पर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्यात होत असलेल्या अनलॉक अंतर्गत आता बहुतांश उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. अशात प्रतिबंधित ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश। अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात होत असलेल्या अनलॉक अंतर्गत आता बहुतांश उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. अशात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकानांना आता २ तास वाढवून देत परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच, आता या दुकानी सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू राहतील. याशिवाय अन्य उपक्रमांना अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांनी काढले आहे.या आदेशानुसार, गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी राहील. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच कोचींग क्लासेस ३१ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन व दूरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहणार असून या शिक्षणास प्रोत्साहन दिले जाणार आहे. शैक्षणिक संस्थेतील ५० टक्के क्षमतेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि संबंधित कामाकरिता एकाच वेळी उपस्थित राहण्याची परवानगी गुरूवारपासून (दि.१५) देण्यात आली आहे. मात्र आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागामार्फत आदर्श कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षणास परवानगी देण्यात येणार असून हे उपक्रम गुरूवारपासून सुरू राहतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील केवळ संशोधन अभ्यासक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था ज्यांना प्रयोगशाळेतील प्रायोगिक कामांची आवश्यकता असेल त्यानुसार गुरूवारपासून सुरू ठेवण्याची परवानगी राहील. सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालयांना शारीरिक अंतर व स्वच्छतेचे निकष पाळून गुरूवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मनोरंजनाकरीता बाग व उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील आठवडी तसेच गुरांचे बाजार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून शासनाने कोरोनासाठी निर्गमित केलेल्या सूचना-नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. जिल्ह्यात रेल्वेने आगमन झालेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल व शिक्के मारण्यात येईल. संबंधित प्रवाशांना कोविड-१९ संदर्भातील सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहील.आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापनांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांनी कळविले आहे.विवाह सोहळ्यांत ५० जणांना परवानगीकोरोनाचा प्रादुर्भाव बघता गर्दी टाळणे गरजेचे असल्याने विवाह सोहळे व वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमांकरिता आणि संबंधित कार्यक्रमांकरिता ५० पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी राहणार नाही. तसेच अंत्यसंस्काराकरिता २० पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती असू नये असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या