धक्कादायक! गोंदियात तरुणीवर अॅसिडहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:53 IST2019-12-18T15:53:18+5:302019-12-18T15:53:51+5:30
जिल्ह्यातील मुंडीपार गावात बसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपीने बुधवारी सकाळी अॅसिड फेकल्याची घटना घडली.

धक्कादायक! गोंदियात तरुणीवर अॅसिडहल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील मुंडीपार गावात बसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपीने बुधवारी सकाळी अॅसिड फेकल्याची घटना घडली. दुचाकी वाहनावरून दोन तरुण या पिडित मुलीच्या जवळ आले. त्यांनी तिच्या अंगावर अॅसिड फेकले आणि तात्काळ फरार झाले. काय घडले हे कळायच्या आतच त्यांनी तेथून पळ काढला. ही तरुणी नागपुरात शिक्षण घेत असून ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली असताना ही घटना घडली. या तरुणीचे शरीर अॅसिडने भाजले असून तिला नागपूरला उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.