शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:28 IST

आजची पिढी ही कुटूंबातील, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत असल्याचे दिसून येत नाही. त्यांना कुटूंब सोडून वेगळे किंवा वृध्दाश्रमात राहावे लागते.

ठळक मुद्देन्या.तहसीलदार : कायदेविषयक जनजागृती शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजची पिढी ही कुटूंबातील, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत असल्याचे दिसून येत नाही. त्यांना कुटूंब सोडून वेगळे किंवा वृध्दाश्रमात राहावे लागते. त्यांना संरक्षणासाठी कायदे तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश ए.बी.तहसीलदार यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये व ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या योजना यावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथे करण्यात आले होते. कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी वासंती मालोदे, अ‍ॅड. बिना बाजपेई, आशा ठाकुर, नामदेव कोसलकर उपस्थित होते.न्यायाधीश तहसीलदार पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना न्याय पाहिजे असल्यास त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचे पालन-पोषण त्याचा मुलगा करीत नसेल तर त्यांनी कलम १२५ (३) अन्वये मुलाकडून पोटगी घ्यावी व प्रकरण न्यायालयात दाखल करावे असे सांगितले. न्या.श्रीमती मालोदे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात नोकरी करीत असतील व आई-वडील म्हातारे घरी राहतात व त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मुलांमध्ये आई-वडीलांप्रती आत्मीयता कमी होते. त्यांना आधार नसतो. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना त्या मुला-मुलींच्या विरोधात प्रकरण दाखल करता येते असे सांगितले.अ‍ॅड. बाजपेई म्हणाल्या, व्यक्ती हा विचाराने कमजोर होत नाही तर तो शरीराने कमजोर होतो.आशा ठाकुर म्हणाल्या, स्वत:च्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांवर त्याच्या मुलाचे नियंत्रण व प्रेम असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मुलांनी वागले तर दुरावा निर्माण होत नाही. यावेळी न्यायीक अधिकारी, वकील, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एस.जी.कान्हे, जी.सी.ठवकर, श्रीमती डी.ए.थोरात. एल.पी.पारधी, प्रेक्षिक गजभिये, ए.जे.नंदेश्वर, गुरु दयाल जयतवार यांनी सहकार्य केले. संचालन व आभार अ‍ॅड. मंगला बंसोड यांनी मानले.