शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला आमच्या मूळ गावी पाठवा ! नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील परिसरात गावकऱ्यांचे आंदोलन

By अंकुश गुंडावार | Updated: December 4, 2025 18:57 IST

Gondia : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत येथील पुनर्वसित सर्व नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या विरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या मूळ गावी परत जाण्याचा ठाम निश्चय केला होता.

सडक अर्जुनी : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत येथील पुनर्वसित सर्व नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या विरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या मूळ गावी परत जाण्याचा ठाम निश्चय केला होता. ठरल्याप्रमाणे श्रीरामनगरवासी कोसमघाट ,मनेरी  मार्गे व्याघ्र प्रकल्पातील कालीमाती गवत कुरण परिसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही ,असा पवित्रा श्रीरामनगरवाशी यांनी  घेतला आहे. 

यावेळी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा वन अधिकारी पवनकुमार जोंग यांनी नागरिकांना एक महिन्यात काही मागण्या शासन दरवाढ लावून मार्ग काढून गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा पवित्र घेतला आहे.

कालीमाती, कवलेवाडा , झलकारगोंदी ह्या गावातील नागरिकांच्या अनेक रास्त मागण्या शासनाच्या माध्यमातून पूर्ण न झाल्यामुळे आज ४ तारखेला आपल्या स्वगावी जाण्याचा निर्णय घेतला होता. अंदाजे दहा ते बारा ट्रॅक्टर घेऊन, आपल्या परिवारांसोबत कालीमाती गवतकुरण परिसरात पोहोचले. सायंकाळी स्वतः जेवणाची व्यवस्था करून अंदाजे तीनशे श्रीरामनगरवाशी तंबू लावून निर्णय होईपर्यंत ,कालीमाती गवतकुरण परिसरात ठिया मांडून राहण्याचा पवित्रा घेतला आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या पूर्ण बारदानासह श्रीरामनगरवाशी कालीमाती गवत कुरण परिसरात पोहोचले. 

यावेळी गोंदियाचे उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग , नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रीतमसिंग  कोडापे, उपविभागीय वन अधिकारी दुर्गे ,नवेगाव - नागझीरा व्याघ्र प्रकल्पाचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रतिभा  रामटेके, बोंडेचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मगर, वनपरिक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी,  सडक अर्जुनी तहसीलदार, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे थानेदार गणेश वणारे, वनविभाग, वन्यजीव विभागाचे व पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अंतर्गत रस्ते केले वनविभागाने बंद

कोसमघाट गावात जवळून  व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी असलेल्या मार्गावरून श्रीरामनगरवाशी कालीमाती  गवत कुरण परिसरात पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. सायंकाळी तीन वाजता जेसीबी चे माध्यमातून रस्त्यावर  आडवी नाली करून रस्ते बंद करण्यात आले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Villagers Demand Return to Ancestral Land in Tiger Reserve, Protest!

Web Summary : Shri Ramnagar villagers protest, demanding a return to their ancestral villages within the Navegaon-Nagzhira Tiger Reserve due to unfulfilled promises. Officials attempted negotiation, but villagers remain firm, camping at Kalimati with supplies until their demands are met. Roads were blocked by the forest department.
टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य