शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तुमच्या गावाचा कारभार पाहा एका क्लिकवर; 'मेरी पंचायत' ॲपवर मिळेल सरपंचाचा लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:32 IST

Gondia : 'मेरी पंचायत'वर क्लिक केल्यास दिसणार गावांचा कारभार ! पंचायत राज मंत्रालयाने ग्रामस्थांसाठी आणले अॅप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, एका क्लिकवर सर्वसामान्यांना माहिती मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने एक पाऊल पुढे टाकत 'मेरी पंचायत' हे अॅप आणले आहे. या माध्यमातून लोकांना आता आपल्या गावचा कारभार कसा सुरू आहे? याची माहिती सहजरीत्या उपलब्ध होणार आहे.

केंद्र तसेच राज्य शासनाने ग्रामपंचायत अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. विकासाच्या वाटेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पादर्शकता असावी व लोकांनाही आपल्या गावात काय सुरू आहे? कोणत्या योजना आल्या आहेत? किती निधी कोणत्या सरकारकडून मिळाला? आदी प्रश्नांची उत्तरे सहजरीत्या उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' हे अॅप आणले आहे.

लेखाजोखा येणार समोर'मेरी पंचायत' या अॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक तसेच आर्थिक बाबींचा लेखाजोखा लोकांच्या समोर येणार आहे. त्यामुळे आता गावाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी लोकांना आता ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही.

२५० शब्दांत नोंदवा अभिप्रायग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थ म्हणून तुम्ही २५० शब्दांत आपला अभिप्रायदेखील नोंदवू शकता. स्थानिक पातळीवरील एखाद्या कामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाला स्मरण करून देऊ शकता. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामाचे कौतुक किंवा चुका निदर्शनास आणून देऊ शकता.

ॲपवर काय-काय दिसणार?

  • या माध्यमातून लोकांना ग्रामपंचायत सदस्य किती? एकूण किती समित्या स्थापन केल्या आहेत ? त्यांचे अध्यक्ष कोण आहेत? नोटीस बोर्डच्या माध्यमातून समाजाला काय सूचित केले ? ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान कोणत्या प्रकारचे आहे?
  • आपल्या पंचायतीची एकूण बँक 3 खाती किती आहेत, त्यात किती रक्कम शिल्लक आहे, कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च केली, ग्रामपंचायतीने केलेले एखादे काम कोणत्या स्टेजवर आहे, दिलेली देयके कशाप्रकारे दिली गेली, याची माहिती मिळते.
  • गावात पाण्याचे स्रोत व नळ 3 कनेक्शन किती आहेत? पाणी तपासणी कोण करते? हे जाणून घेण्याची सुविधाही अॅपमध्ये आहे.

"ग्रामीण प्रशासनातील कामकाज पारदर्शक पद्धतीने लोकांपुढे मांडण्यासाठी व लोकांच्या सूचना विचारात घेण्यासाठी शासनाने एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणून 'मेरी पंचायत' अॅप कार्यान्वित केले आहे."- रितेश शहारे, ग्रामपंचायत अधिकारी, भजेपार

"केंद्र सरकारच्या 'मेरी पंचायत' या अॅपद्वारे गावाच्या विकासाचा लेखाजोखा प्रत्येक व्यक्तीसमोर येणार आहे. त्यामुळे हे अॅप अत्यंत उपयुक्त आहे.- ओ. जी. बिसेन, ग्रामपंचायत अधिकारी

'मेरी पंचायत' या अॅपमुळे गाव पातळीवर होणाऱ्या विकासात्मक गोष्टींसोबतच विविध लेखी सूचना घरबसल्या करू शकतो. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे अॅप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावातील प्रत्येक युवकाने संबंधित अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे."- कमलेश बिसेन, जिल्हाध्यक्ष, ग्रामपंचायत अधिकारी संघटना

टॅग्स :gondiya-acगोंदियाgram panchayatग्राम पंचायत