सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (जिजाऊ)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:16+5:302021-01-13T05:15:16+5:30
सर्वप्रथम प्राचार्य मंत्री व पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्रांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ...

सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (जिजाऊ)
सर्वप्रथम प्राचार्य मंत्री व पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्रांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक समिती सदस्य अर्चना गुरनुले यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती विशद केली. वर्ग ५ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने व्हिडिओद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. प्राचार्य मंत्री यांच्या कल्पनेतून कार्यक्रमाचा 'अभिवादन संदेश' व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. या व्हिडिओतील स्वामी विवेकानंद यांचे मार्गदर्शक विचार व संदेश तसेच सुविचार विद्यार्थ्यांनी वहीत नोंद करून ठेवावे असे मार्गदर्शन करण्यात आले. संचालन करून आभार गुरनुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे, भाग्यश्री सिडाम, माधुरी पिलारे, पंकज मोरे, रूपराम धकाते, महेश पालीवाल व शिक्षकांनी सहकार्य केले.