महिलांशी असभ्य वागणूक

By Admin | Updated: January 25, 2015 23:18 IST2015-01-25T23:18:32+5:302015-01-25T23:18:32+5:30

तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. येथे गोंदियावरून आलेल्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी महिलांसह

Rude behavior to women | महिलांशी असभ्य वागणूक

महिलांशी असभ्य वागणूक

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. येथे गोंदियावरून आलेल्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी महिलांसह असभ्य वागणूक करून घाणेरड्या शब्दांचा वापर करून अपमानित केल्याचा प्रकार घडला.
सोनेगाव येथील सेवा सहकारी संस्था ही गावातीलच शेतकऱ्यांची असून सभासदही शेतकरीच आहेत. या संस्थेवर सचिव, अध्यक्ष व संचालक मंडळाची देखभाल असते. संस्थेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदियाकडून कर्ज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केला असतानाही काही शेतकऱ्यांना ३० आॅक्टोबर २०१३ च्या कर्ज वसुली मागणीचे नोटीस आता दिले. दोन वर्षांनंतर नोटीस कशा आल्या, याचा शेतकऱ्यांना धक्काच बसला. १६ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी जुनी मागणी नोटीस देण्यात आली. यानंतर १७ जानेवारी २०१५ रोजी गोंदियावरून आलेले बँकेचे वसुली अधिकारी मेश्राम, निमजे, सचिव हरिणखेडे, अध्यक्ष व इतर कर्मचारी वर्गांनी गावातील केशवराव परसराम बावणकर, कोढेश्वर लोकचंद भगत, मनोहर रतिराम बावणकर, व्यंकटराव दशाराम रहांगडाले यांच्या घरांची जप्ती केली. त्यांच्या घरातील तांदूळ, धानाची पोती, सोफा, टीव्ही आदी सामान-साहित्यांची उचल करून ट्रक्टरमध्ये घातले. दरम्यान गावातील महिलांनी ट्रक्टरवर चढून सामान नेण्यास मनाई केली व चक्क ट्रक्टरवरच बसून राहिले.
शेतकरी कोदू रहांगडाले, जितेंद्र भगत, बंशीलाल रहांगडाले, गोविंद भगत, बालचंद गौतम, मानिक भगत, मोगीलाल भगत, दिनदयाल रहांगडाले यांच्यावर थकीत कर्ज किंवा फारसे मोठे कर्ज नसतानाही वसुली अधिकारी त्यांच्या घरी जप्तीसाठी गेले. दरम्यान वसुली अधिकाऱ्यांनी महिलांशी असभ्य वागणूक केली. घाणेरडे शब्द वापरून महिलांना अपमानित केले. यावर महिलांनीसुद्धा त्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना जप्तीचे आदेश मागितले असता त्यांनी पळ काढला. या प्रकाराने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर शेतकरी तिरोडा तालुका सहायक निबंधक गोस्वामी यांच्या कार्यालयात विचारपूस करण्यासाठी गेले. या शेतकऱ्यांनी आरआरसी व सेवा सहकारी संस्था सोनेगाव येथे कसलाही व्यवहार केला नाही. जप्ती व वसुलीचे अधिकार त्यांना नाहीत. त्यांची वसुलीची पद्धत चुकीची असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. तसेच आपण चौकशी करून सचिव व अध्यक्षावर कारवाई करू, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Rude behavior to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.