शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाने केली शेतकऱ्यांची निराशा : उत्पादनावर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस जोर धरत नसल्याने रोवणीच्या कामात खंड पडला आहे.त्यामुळे रोवण्या लांबल्या असून त्याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात दररोज पावसासाठी अनुकुल वातावरण तयार होते. मात्र पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस होवून तूट भरुन न निघाल्यास पुढील काळ शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी सुध्दा अडचणीचा आहे.यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसल्याने सर्वच सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा आहे. तर काही सिंचन प्रकल्पातील पाणी रोवणीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा आता राखीव साठा शिल्लक आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर रुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे मागील तीन चार वर्षांच्या कालावधीत प्रथमच रोवणीसाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्याची वेळ आली. तर पावसाअभावी रोवण्या लांबत असल्याने धानाच्या उत्पादनात सुध्दा १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी विभागाने सुध्दा पाऊस लांबत असल्याने पिकांची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. सध्या जिल्ह्यावासीयांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस