शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स, लॉज व विश्रामगृहांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यापासूनच हॉटेल्स, लॉज व विश्रामगृह बंद पडले होते. आता सुमारे ४ महिन्यांचा कालावधी लोटत असून त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने हे सर्व व्यवसायी अडचणीत आले होते. राज्यात अनलॉकींगची प्र्रक्रीया सुरू असतानाच सर्व व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती. मात्र फक्त हॉटेल्स व लॉज बंद होते. अशात त्यांनीही लवकरात लवकर त्यांचा हा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्देसुरू करण्यास परवानगी : ठरवून दिलेल्या नियमांचे पालन बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील हॉटेल्स, लॉज, विश्रामगृह तसेच निवासाची व्यवस्था पुरविणाऱ्यांचा व्यवसाय बंद होता. आता मात्र त्यांना राज्य शासनाने दिलासा दिला असून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले असून यासाठी मात्र ठरवून देण्यात आलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे.कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यापासूनच हॉटेल्स, लॉज व विश्रामगृह बंद पडले होते. आता सुमारे ४ महिन्यांचा कालावधी लोटत असून त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने हे सर्व व्यवसायी अडचणीत आले होते. राज्यात अनलॉकींगची प्र्रक्रीया सुरू असतानाच सर्व व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती. मात्र फक्त हॉटेल्स व लॉज बंद होते. अशात त्यांनीही लवकरात लवकर त्यांचा हा व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता राज्यातील हॉटेल्स, लॉज, विश्रामगृह व निवासाची व्यवस्था पुरविणाऱ्या व इतर आस्थापनांनाही परवानगी देण्यात आली आहे. यासाठी मात्र त्यांना त्यांच्याकडील ३३ टक्के कर्मचारी क्षमतेसह ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.विशेष म्हणजे, ही परवानगी कंटेन्मेंट झोनबाहेरील आस्थापनांसाठी आहे. शिवाय, ज्या आस्थापनांचा वापर अलगीकरण केंद्रासाठी केला जात असेल तो तसाच सुरू राहणार आहे. तसेच या आस्थापनांची न वापरलेली क्षमता अलगीकरण केंद्रासाठी घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनास राहणार आहे.या आहेत अटी-शर्तीसंबंधितांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पोस्टर,बॅनर्स व चलचित्र दर्शनी भागावर लावणे, हॉटेल तसेच बाहेर परिसरात गर्दीबाबत योग्य व्यवस्थापन करणे, प्रवेशाच्या ठिकाणी हँडवॉश-सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था तसेच रिसेप्शनवर संरक्षणात्मक काचेचा वापर करणे, कर्मचारी व पाहुण्यांसाठी मास्क, हातमोजे उपलब्ध करणे, जास्तीतजास्त कॉन्टॅक्टलेस प्रक्रीयेचा अवलंब करणे, फक्त निरोगी व मास्क च वापर करणाºयांच प्रवेशाची परवानगी देणे यासह अन्य अटी-शर्तींचे पालन बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल