शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन पॅकेज थंडबस्त्यात

By admin | Updated: January 27, 2015 23:35 IST

पुनर्वसन पॅकेजमध्ये आपल्या कुटुंबीयांवर अन्याय झाल्याचे सांगत गाव सोडण्यास नकार देणाऱ्या त्या दोन कुटुंबीयांना अजूनही शासनाकडून न्यायाची आस आहे. वनवासी जीवन जगत मूळ गावातच

युवराज वालदे - चिखलीपुनर्वसन पॅकेजमध्ये आपल्या कुटुंबीयांवर अन्याय झाल्याचे सांगत गाव सोडण्यास नकार देणाऱ्या त्या दोन कुटुंबीयांना अजूनही शासनाकडून न्यायाची आस आहे. वनवासी जीवन जगत मूळ गावातच ठाण मांडून बसल्याने वनविभागाच्या मानव वसाहतरहीत वनक्षेत्र योजनेला तडा जात आहे. आत्माराम माधो वाढवे (७०) व नंदलाल हिरामण बागडे (५०) अशी त्या पीडित कुटुंब प्रमुखांची नावे आहेत. नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी अतिसंरक्षित वनक्षेत्रातील कालीमाटी, कवलेवाडा व झनकारगोंदी या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने जाहीर केलेले पुनर्वसन धोरण, राष्ट्रीय पुनर्वसन व विस्थापन धोरण २००६ च्या वनाधिकार अधिनियम २००६ मधील तरतूद तसेच वेळोेवेळी केंद्र व राज्य शासनाव्दारे पुनर्वसनाबाबत जाहीर केलेल्या दिशानिर्देशानुसार, प्रति कुटूंब १० लाख रूपये रोख घेऊन कुटुंब स्वेच्छेने पुनर्वसीत होईल या पर्यायावर कवलेवाडा, काळीमाटी व झनकारगोंदी या गावांतील कुटुंबीयांचे सौंदडजवळ श्रीरामनगर येथे गावठान जागा उपलब्ध करून पुनर्वसन करण्यात आले. सन २००८ मध्ये सदर गावातील जमिनीची खरेदी-विक्री बंद करण्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. यात सन २००८ मध्ये ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले त्यांना कुटूंब मानून पुनर्वसन आराखड्यात समावेश करून १० लाख रूपये रोख पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आले. पीडित आत्माराम वाढवे व नंदलाल बागडे यांच्याबरोबरच त्यांच्या दोन्ही मुलांचा अनुक्रमे मंगेश व गणेश यांचाही आराखड्यात समावेश करण्यात आला. १० लाख रूपये पैकेजपैकी सुरुवातीला दोन लाख रूपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र उर्वरित आठ लाख रूपये जमा करण्यात आले नाही. आत्माराम यांच्या कुटुंबात सहा लोक असून पाच एकर शेती आहे. तर नंदलाल यांच्याही कुटुंबात पाच लोक असून पाच एकर शेती आहे. दोन्ही कुटुंबातील दोन्ही मुलांचे नाव वगळल्याने फक्त १० लाख रुपयांत शेती विकत देऊन कुटुबांचा उदरनिर्वाह कसा करणार?, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १० लाखाच्या पॅकेज बरोबरच शेती व घराचे वेगळे पैसे मिळतील, असे आश्वासन दिले. सोबतच आदिवासींना भूमिहीन करता येत नाही, असेही आश्वासन दिले. मात्र नंतर दिशाभूल केली, असा आरोप पीडितांनी वनविभागावर केला आहे. आमच्यावर झालेल्या अन्यायाची शासन दखल घेवून आतातरी न्याय देईल, या आशेवर हे कुटुंब अतिशय घनदाट जंगलात, आधुनिक युगातही वीज, पाणी, रस्ते व शिक्षण मुलभूत गरजांपासून वंचित राहून जंगली स्वापदांच्या गराड्यात वनवासी जीवन जगत आहेत. यामुळे मात्र वनविभागाच्या महत्वाकांक्षी मानव वसाहत विरहीत वनक्षेत्र योजनेलाच तडा जात आहे.