शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

उपाहारगृहांमध्ये दूषित पाणी अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 8, 2014 22:41 IST

गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या

गोंदिया : गोदिया शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या हॉटेलांमध्ये ग्राहकांना देण्यासाठी शुद्ध पाणीच नसते. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी पाणी विकत घेऊन प्यावे यासाठी म्हणून मुद्दाम पाण्याच्या शुद्धतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही पहायला मिळत आहे. मात्र हा प्रकार नियमबाह्य असताना अन्न व औषध प्रशासन विभाग त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येते.जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे आरोग्याला धोका असतो. शहरात हॉटेलांमध्ये अशा प्रकारे अशुद्ध पाणी वापरले जाते. गोंदिया शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. गोंदिया शहरातील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही येथील पाण्याचा हातगाडी व्यवसायिक उपयोग करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल त्यावेळी याच विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्य पदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिल्या जाते. अनेकदा या पाण्यात जंतू, चामडोक आढळून येतात. या हॉटेलांमध्ये बनणारे पदार्थ हे चरमरीत आणि तेलकट असतात. त्यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते. तसेच प्रत्येकाचीच असे पदार्थ खाल्ल्यावर पाणी विकत घेऊन खाण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य जास्त धोक्यात येते. (प्रतिनिधी)