शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यातील नर्सेसच्या वेतनातून केली कपात

By admin | Updated: January 29, 2015 23:10 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आयपीएचएस अंतर्गत कार्यरत कंत्राटी परिचारिका (नर्सेस) यांनी आपल्या वेतनाची समस्या सोडविण्याबाबत व इतर मागण्यांना घेवून जि.प. अध्यक्ष

गोंदिया : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आयपीएचएस अंतर्गत कार्यरत कंत्राटी परिचारिका (नर्सेस) यांनी आपल्या वेतनाची समस्या सोडविण्याबाबत व इतर मागण्यांना घेवून जि.प. अध्यक्ष व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले.निवेदनानुसार, मार्च २०१३ पर्यंत सदर कंत्राटी नर्सेस यांना ११ व १३ हजार रूपये मानधन मिळत होते. परंतु एप्रिल ते डिसेंबर २०१३ पर्यंत गोरेगाव, आमगाव, तिरोडा व गोंदिया या चार तालुक्यातील ११० कंत्राटी नर्सेस यांना ११ हजार व १३ हजार रूपये मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे नऊ महिन्यांचे ३ हजार रूपयेप्रमाणे प्रत्येकी २७ हजार रूपये एरिअस देण्यात यावे. वाढत्या महागाईनुसार मानधनात वाढ केली जाते. परंतु सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मान्य टिपणीनुसारसुद्धा तीन ते आठ टक्के वाढीव मानधन लागू करण्यात आले नाही. ते दुरूस्त करून वाढीव मानधन देण्यात यावे. सन २००७ पासून गोंदिया जि.प. मार्फत कंत्राटी एएनएम, एलएचव्ही व एसएन यांना ११ महिन्यांच्या करारावर न ठेवता नियमित शासन सेवेत समाविष्ट करण्याचा ठराव जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात यावा. जेष्ठता यादी बनवून परीक्षेची व वयाची अट ठेवण्यात येवू नये. कंत्राटी नर्सेस यांना तीनऐवजी सहा महिन्यांची प्रसुती रजा मंजूर करण्यात यावी व सर्व वैद्यकीय लाभ देण्यात यावे. वाढत्या महागाईनुसार एकमुस्त मिळणाऱ्या ५०० रूपये प्रवास भत्त्यात वाढ करावी. ११ महिन्यांचे करार संपताच फेरबदल न करता त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी. दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत मानधन देण्यात यावे. सर्व कंत्राटी नर्सेस यांना १० लाख रूपयांचे विमा संरक्षण, आरोग्य विमा लागू करण्यात यावा. आरोग्य विभागात कंत्राटी नर्सेस पदावर कार्यरत ६० वर्षे वयाच्या कर्मचाऱ्यांना पेंशन लागू करण्यात यावे. ग्रामीणप्रमाणे शहरी विभागात कार्यरत नर्सेस यांना मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) गोंदियातर्फे जि.प. अध्यक्ष व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)