पटोलेंना गृहजिल्ह्यात धक्का; काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दहिवले यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 10:38 IST2023-02-25T10:31:07+5:302023-02-25T10:38:04+5:30

पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत रत्नदीप दहिवले यांनी राजीनामा

Ratnadeep Dahiwale district executive Of Gondia District Congress resigned in protest against Nana Patole | पटोलेंना गृहजिल्ह्यात धक्का; काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दहिवले यांचा राजीनामा

पटोलेंना गृहजिल्ह्यात धक्का; काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दहिवले यांचा राजीनामा

गोंदिया : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यातच त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील थोरात आणि पटोले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पटोले यांच्यावर काँग्रेस पक्षातील विविध नेत्यांनी गंभीर आरोप करत त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. ही संपूर्ण परिस्थिती ताजी असतानाच, आता पटोले यांच्या गृहजिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दहिवले यांनी राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाचे शुक्रवारपासून (दि.२४) छत्तीसगड येथील रायपूर येथे महाअधिवेशन सुरू असताना, यादरम्यान काँग्रेस पक्षातील विविध मोठे नेते या महाअधिवेशनाला हजेरी लावणार आहेत.

Web Title: Ratnadeep Dahiwale district executive Of Gondia District Congress resigned in protest against Nana Patole