पुतळी येथे मिळाला रौनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 08:55 PM2019-07-04T20:55:20+5:302019-07-04T20:55:36+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम घटेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोरून अपहरण करण्यात आलेला रौनक गोपाल वैद्य (७) गुरूवारी (दि.४) सुमारे ३३ किमी अंतरावरील देवरी तालुक्यातील पुतळी (शेंडा) येथे सुखरूप आढळला. पोलिसांनी त्याला पालकांच्या सुपूर्द केले. पण रौनकचे अपहरणकर्ते मात्र अद्याप पोलिसांच्या हाताबाहेर आहेत.

Ranau got here at Pupil | पुतळी येथे मिळाला रौनक

पुतळी येथे मिळाला रौनक

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केले पालकांच्या सुपूर्द : अपहरणकर्ते अद्याप हाताबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम घटेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोरून अपहरण करण्यात आलेला रौनक गोपाल वैद्य (७) गुरूवारी (दि.४) सुमारे ३३ किमी अंतरावरील देवरी तालुक्यातील पुतळी (शेंडा) येथे सुखरूप आढळला. पोलिसांनी त्याला पालकांच्या सुपूर्द केले. पण रौनकचे अपहरणकर्ते मात्र अद्याप पोलिसांच्या हाताबाहेर आहेत.
बुधवारी (दि.३) दुपारी २.३० वाजतादरम्यान शाळेच्या दुपारच्या सुटीत रौनक आपल्या मित्रांसोबत शाळेसमोर खेळत होता. दरम्यान स्कुटीवर आलेल्या दोघांनी त्याला उचलून नेले होते. शाळेकडून पालकांना व पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच रौनकचे वडील गोपाल ईश्वरदास वैद्य (३८) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. रौनकचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथक गठीत करून तपासाला सुरूवात केली. मात्र, गुरूवारी (दि.४) कुणीतरी फोनकरून पोलिसांना अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थी पुतळी (शेंडा) येथे असल्याचे सांगीतले. त्या आधारे पोलिसांनी जावून बघितले असता तो रौनक होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पालकांच्या सुपूर्द केले.
डुग्गीपार पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय पवार यांना विचारणा केली असता त्यांनी अपहरणकर्त्यांबाबत माहिती नसून शोध घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Ranau got here at Pupil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.