शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रानातील गुणकारी रानमेवा यंदा लांबला

By admin | Updated: May 1, 2015 00:10 IST

टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे

गोंदिया : जिल्ह्याला लाभलेल्या मोठ्या जंगल क्षेत्रात व इतरत्रही टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे व शेंगा हा जंगलातील रानमेवा दरवर्षी मार्च मिहन्यापासून मे, जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. परंतु यावर्षी पडलेला कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम रानातील फळांवरही झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे कुटुंब हवालिदल झाले आहे.मोलमजुरी करून आपला उदरिनर्वाह करणाऱ्याया डोंगर कपारीतील आदिवासींना शेतीचा हंगाम संपला की फेब्रुवारी, मार्च महिन्यात वनातील रानमेव्यापासून चांगला रोजगार मिळून आर्थिक लाभ होतो. टेंभूर व भाजीसाठी उपयुक्त फळ विकण्यापासून या हंगामाला सुरूवात होते. यानंतर चारं, चारोळी, डिंक, आवळा, करवंद, बिबुली, जांभुळ, मोहफूल, आंबा, फणस, विलायती चिंच, कवठं, गावरानी चिंच, मध याप्रमाणे रानमेवा विक्र ीला सुरूवात होते. यावर्षी एप्रिल मिहन्याचा शेवटचा आठवडा संपत असताना काही भआगात टेंबरं विक्रीला बाजारात आले आहेत. अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे फळांचा मोहर व फुले गळून गेल्याने आणि वातावरणात वारंवार बदल होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत हे सर्व फळं कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. मार्च महिन्यात चारे, बिबुली ही फळे विक्रीला येतात. मात्र एप्रिल महिना संपत असतानाही अद्याप कच्चीच फळे झाडाला लागलेली दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे व नैसिर्गक बदलामुळे फळांचा आकारही यावर्षी लहान झाला आहे. झाडातच ताकद न उरल्याने ही फळे मोठी होऊन पिकायला आणखी काही दिवस लागणार आहे. परिणामी यावर्षी प्रत्येक फळांचा हंगाम एक मिहना उशीराने सुरू होणार आहे. रासायनिक पद्धतीने पिकविलेली फळे मुलांना खाऊ घालण्यापेक्षा गुणकारी वन औषधी असलेला रानमेवा मुलांना खाऊ घालण्याकडे पालकांचा कल जास्त असतो. त्यामुळे या रानमेव्याला बाजारात भावही चांगला मिळतो.जिल्ह्यातील बरेच कुटुंब या रानमेव्याच्या विक्र ीतून पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. आदिवासी बांधव या रानमेव्यातून हजारो रूपयाची आर्थिक उलाढाल करीत असतात. परंतु यावर्षी रानमेव्याचा हंगाम लांबल्याने आणि ही फळेही कमी प्रमाणात असल्याने या रानमेव्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक नुकसान झाले. (प्रतिनिधी)