शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

पहाटे उठून घरोघरी ‘जय गंगा भजना’चा नित्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:53 AM

समाजातील वेगवेगळे घटक आपल्या आवडीनिवडीनुसार रोजगार व्यवसाय करीत उदरनिर्वाह व जीवन जगण्याकरीता स्वतंत्र आहे. असले तरी आजही समाजातील अनेक लोक आपला वंशपरंपरेनुसार चालत आलेल्या कामाचा वारसा पुढे नेत आहेत.

ठळक मुद्देछिद्दी राणा यांचा उत्साह कायम : ८५ व्या वर्षातही पायी प्रवास

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : समाजातील वेगवेगळे घटक आपल्या आवडीनिवडीनुसार रोजगार व्यवसाय करीत उदरनिर्वाह व जीवन जगण्याकरीता स्वतंत्र आहे. असले तरी आजही समाजातील अनेक लोक आपला वंशपरंपरेनुसार चालत आलेल्या कामाचा वारसा पुढे नेत आहेत. असाच एक बसदेव समाज तालुक्यातील कोटजमूरा या गावात वास्तव्यास असून दररोज पहाटे उठून घरोघरी ‘जय गंगा गायन’ करीत दान दक्षिणा स्वीकार करुन आपले जीवन यापन करीत आहे.८५ वर्षीय छिद्दी राणा नावाचे म्हातारे बसदेव आज आत्मनिर्भर असून सकाळी जय गंगा करीत असून इतर वेळेत आपल्या कलागुणांचा वापर करीत कुलूप किल्ली व छत्री दुरुस्तीची कामे करीत मेहनत व इमानदारीने आपले स्वस्थ जीवन जगत आहेत. मूळत: मध्यप्रदेशच्या महाकौशल भागात वास्तव्यास असलेला बसदेव समाज महाराष्ट्राच्या सीमेलगत बालाघाट जिल्ह्यात काही प्रमाणात आहे. तसेच सीमेलगत गोंदिया जिल्ह्याच्या काही गावांमध्ये स्थायी झालेला आहे. तालुक्यातील ग्राम कोटजमूरा येथे जेमतेम १० घरांचे बसदेव कुटूंबीय राहत असून प्रत्येक परिवारातील कुटूंब प्रमुख सकाळी उठून तालुक्यातील गावांमध्ये जाऊन ‘जय गंगा भजन गायन’ करीत दान दक्षिणा घेतात.मागील ५० वर्षापासून या गावात स्थायी झालेले बसदेव कुटूंबीय सकाळी आपले पारंपारीक कार्य करीत दिवसभर इतर कला कुसरीची कामे करुन अर्थार्जन करतात. बसदेव छिद्दीलाल रायसिंग राणा आज ८५ वर्ष वयाचे झालेले असून स्वस्थ आहेत. आजही ते आत्मनिर्भर आहेत. त्यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता वयाच्या १२ व्या वर्षापासून ते दररोज पहाटे ४ वाजे उठून आंघोळ करुन देवाला नमस्कार व पूजन करुन घराबाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.कुठल्याही एका गावात जाऊन पहिल्या घरापासून त्यांच्या अंगणात ‘जय गंगा भजन गायन’ करीत असतात. एकानंतर दुसरे घर असे करता करता सकाळी ८ वाजतापर्यंत जेवढे घर शक्य झाले तेवढ्या घरी भजन गायन करीत जे काही तांदूळ व पैसे प्राप्त झाले ते स्वीकारुन घरी परतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उठने व ‘जय गंगा भजन’ करायला जाने हा त्यांचा नित्यक्रम असून छिद्दी राणा मागील ७३ वर्षापासून हे कार्य करीत आहेत. त्यांच्या रोज सकाळी पहाटे जागणे व रात्रीला वेळेवर झोपणे या नित्यक्रमामुळे त्यांचे आरोग्य वयाच्या ८५ व्या वर्षातही ठणठणीत आहे. आजही ते एका गावातून दुसºया गावात पायी चालत जातात. सायकल सुद्धा चालवित असल्याचे त्यांनी सांगितले.एका घरी एकच वेळा भेटबसदेवा सिद्धी राणा यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले की, ते एका घरी वर्षातून किंवा दोन वर्षातून एक वेळा भेट देऊन ‘जय गंगा भजन गायन’ करतात. साधारणत: जानेवारी ते एप्रिलमध्ये छत्तीसगड राज्यात जाऊन यजमानी राहतात आणि मे महिन्यापासून डिसेंबर महिन्यादरम्यान ते कोटजमूरा या स्वगावाच्या परिसरासह तालुक्यातील विविध गावात आणि सीमेलगत मध्यप्रदेशच्या लांजी तालुक्यातील काही गावात‘ जय गंगा’ गायनास्थळी जातात. सकाळी कोणत्याही घर गेल्यास गावातील प्रत्येक घरातून त्यांना दान दक्षिणा सहज देतात.काय आहे ‘जय गंगा भजन गायन’?बसदेवा पहाटे उठून जय मानाच्या दारावर पोहचताच जय हो, जय हो च्या सुरात जय गंगा गायनाला सुरुवात करतात. त्यांच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हातात कमानीदार टोपली असते. त्या टोपलीत भगवान विष्णू, लक्ष्मी व इतर आराध्य देवतांच्या मूर्ती असतात. अंगणात पोहोचल्यावर सोईस्कर जागेवर बसून आपले फिरते मंदिर खाली ठेवून एका हातात लाकडी टाळ तर दुसऱ्या हातात धातुचा झुनझुना वाजवित ‘जय गंगा गायनाला’ सुरुवात करतो. यादरम्यान रामायण, महाभारतातील मार्मिक प्रसंग किंवा राजा हरिश्चंद्र, राजा मोरध्वज, शिवी, दधिची, अहिल्या, गौतम इत्यादिंच्या जीवनातील धार्मिक व मर्मस्पर्श प्रसंगाला पद्य रचनेत गायन करतात. प्रत्येक ओळीनंतर ‘जय गंगा’ उद्गाराने ओळीचा शेवट केला जातो. त्यामुळे बसदेवा आल्यावर त्यांना ‘जय गंगा’ वाले म्हणून ही संबोधीत केले जाते.