पावसाने वाळलेल्या पऱ्ह्यांना मिळाली संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:18+5:30
२३ जून उजाळला तरी जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस होईल या आशेने धानाची धूळ पेरणी केली होती. मात्र जवळपास पंधरा ते सोळा दिवस पाऊस न झाल्याने धानाचे पऱ्हे देखील वाळत चालले होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची पाळी येण्याची शक्यता वर्तविली जात होती.

पावसाने वाळलेल्या पऱ्ह्यांना मिळाली संजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने सोमवारी (दि.२२) दिवसभर पावसाने हजेरी लावली. दिवसभर झालेल्या पावसामुळे वाळलेल्या धानाच्या पऱ्ह्यांना नव संजीवनी मिळाली.पावसाअभावी चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांना सुध्दा दिलासा मिळाला आहे.
२३ जून उजाळला तरी जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस होईल या आशेने धानाची धूळ पेरणी केली होती. मात्र जवळपास पंधरा ते सोळा दिवस पाऊस न झाल्याने धानाचे पऱ्हे देखील वाळत चालले होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची पाळी येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्ह्यात सरासरी २९.११ मीमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ५१.३६ मीमी पाऊस गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात ४८.६३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर गोंदिया २२.५७ मीमी, तिरोडा २६.७६ मीमी, अर्जुनी मोरगाव १३.५६, देवरी १८ मीमी, सालेकसा ३९.८७ मीमी, सडक अर्जुनी १२.१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मध्यल्या काळात पावसाचा खंड पडल्याने पावसाची तूट कायम असून ती भरुन निघण्यासाठी जिल्हावासीयांना दमदार पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव,बोड्या अद्यापही कोरड्या असल्याचे चित्र आहे. मात्र सोमवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धान पेरणीच्या कामाला काहीसा वेग येण्याची शक्यता आहे.