लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील ढिमरटोली-डव्वा मार्गावरील अंडरग्राऊंड रेल्वे पुलाच्या सदोष बांधकामामुळे या परिसरातील गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी अनेकदा केली होती. मात्र त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नव्हती. अखेर महिलांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर रविवारपासूनच रेल्वे विभागाने येथील पुलाच्या कामाला सुरूवात केली आहे.ढिमरटोली-डव्वा मार्गावर काही वर्षांपूवी भूमिगत पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम सदोष असल्याने या नाल्यातून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने या ठिकाणी पाणी साचून राहत होते. या मार्गाने डव्वा, कवलेवाडा, शहारवाणी, धानुटोला, ईसाटोला, रापेवाडा, चुटिया, चिचटोला येथील गावकरी दररोज ये-जा करतात. मात्र पुलाखाली पाणी साचून राहत असल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. ही समस्या मार्गी लावण्यात यावी यासंदर्भात या परिसरातील गावकऱ्यांनी रेल्वे विभागाला निवेदन दिले. मात्र त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली नव्हती.भाजप तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रकला चौधरी यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात ८ मार्च जागतिक महिला दिनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. रविवारी (दि.८) सकाळपासूनच रेल्वे प्रशासनाने पुलाखालून जेसीबीच्या माध्यमातून पाणी काढण्यासाठी नालीचे बांधकाम सुरू केले. या मुळे अनेक दिवसांपासूनची समस्या अखेर मार्गी लागली आहे.या वेळी भाजप तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रकला चौधरी, कल्पना टेंभरे, योगेश चौधरी, उपसरपंच डॉ.पेमेंद्र कटरे, लोकचंद टेंभरे, किशोर कटरे, दीपक तूरकर उपस्थित होते.
महिलांच्या आंदोलनाची रेल्वेने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST
ढिमरटोली-डव्वा मार्गावर काही वर्षांपूवी भूमिगत पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम सदोष असल्याने या नाल्यातून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने या ठिकाणी पाणी साचून राहत होते. या मार्गाने डव्वा, कवलेवाडा, शहारवाणी, धानुटोला, ईसाटोला, रापेवाडा, चुटिया, चिचटोला येथील गावकरी दररोज ये-जा करतात.
महिलांच्या आंदोलनाची रेल्वेने घेतली दखल
ठळक मुद्देपुलाच्या कामाला केली सुरूवात : ढिमरटोली- डव्वा मार्ग