रेल्वे महाव्यवस्थापक बॅनर्जी यांनी केली रेल्वे स्थानकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:04+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गौतम बॅनजी यांचे शुक्रवारी विशेष रेल्वे गाडीने गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या वेळी स्थानकावर त्यांचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वागत केले. बॅनर्जी हे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहचल्याने लोकप्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिकाºयांना त्यांची गोंदिया रेल्वे स्थानकावर वाट पाहावी लागली. यावेळी रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदिया-बल्लारशा मार्गावरील पांढरी येथील मानवरहित चौकी बंद करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

Railway General Manager Banerjee inspects the train station | रेल्वे महाव्यवस्थापक बॅनर्जी यांनी केली रेल्वे स्थानकाची पाहणी

रेल्वे महाव्यवस्थापक बॅनर्जी यांनी केली रेल्वे स्थानकाची पाहणी

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींनी मांडल्या समस्या : विविध संघटनाकडून निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी हे शुक्रवारी (दि.१७) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी मुंडीकोटा, तिरोडा आणि गोंदिया रेल्वे स्थानकाची पाहणी करुन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध संघटनाच्या प्रतिनिधीशीं चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गौतम बॅनजी यांचे शुक्रवारी विशेष रेल्वे गाडीने गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या वेळी स्थानकावर त्यांचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वागत केले. बॅनर्जी हे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहचल्याने लोकप्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिकाºयांना त्यांची गोंदिया रेल्वे स्थानकावर वाट पाहावी लागली. यावेळी रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदिया-बल्लारशा मार्गावरील पांढरी येथील मानवरहित चौकी बंद करण्याचा मुद्दा उपस्थित केला.या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे गावाचे दोन भागात विभाजन झाले असून त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे बाब निदर्शनास आणून दिली. ही समस्या मांडण्याकरिता पांढरी येथील गावकºयांचे शिष्टमंडळ देखील आले होते. महाव्यवस्थापक बॅनर्जी यांच्यासोबत मंडळ रेल्वे व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय, मंडळ वाणिज्य व्यवस्थापक व बिलासपूर झोनचे अधिकारी उपस्थित होते. गोंदिया रेल्वे स्थानक येथे स्टेशन मास्टर यांच्या कक्षात आ. विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले यांच्यासह विविध शिष्टमंडळानी महाव्यवस्थापक बॅनर्जी यांची भेट घेऊन समस्या मांडली. आ. अग्रवाल यांनी गोंदिया येथील रेल्वे तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. अद्यापही सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात झाली नसून ते केव्हा सुरू करणार असा सवाल उपस्थित केला. तसेच नागपूर-पुणे-नागपूर गरीबरथ या गाडीचा गोंदियापर्यंत विस्तार करण्यात यावा. गोंदिया ते शेगाव दरम्यान नवीन गाडी सुरू करण्यात यावी. गोंदिया डोंगरगड दरम्यान दुपारच्या वेळेत रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी महाव्यवस्थापक बॅनर्जी यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी सर्व समस्या ऐकूण घेत यावर तोडगा काढून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकाचे निरीक्षण केले. डेमू शेड आणि सर्विस इमारत व नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Railway General Manager Banerjee inspects the train station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे