रेल्वे सल्लागार समितीने मानले अधिकाऱ्यांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:33+5:302021-09-17T04:34:33+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताच हळूहळू सर्व नियम व अटी शिथिल करण्यात आल्या; परंतु येथील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० ...

रेल्वे सल्लागार समितीने मानले अधिकाऱ्यांचे आभार
कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताच हळूहळू सर्व नियम व अटी शिथिल करण्यात आल्या; परंतु येथील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रुपयेच होते. यावर रेल्वे विभागाने प्लॅटफॉर्म तिकीटचे दर हे पूर्वीप्रमाणे १० रुपये करावे, अशी मागणी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे सल्लागार समितीने वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली होती. तसेच अन्यथा जनता आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला होता. याची दखल घेऊन लगेच प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर हे पूर्वीप्रमाणे १० रुपये करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. यामुळे समितीने स्टेशन प्रबंधक सावंत व वाणिज्य निरीक्षक सुजित कुमार यांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानले आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक-६ येथे एकच शौचालय असल्याने प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो, स्थानकावरून जाणारा पादचारी पूल प्लॅटफॉर्म क्रमांक ५-६ पर्यंत वाढविण्यात यावा, गोंदिया-बालाघाट तसेच गोंदिया-चंद्रपूर गाड्याही त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. सल्लागार समिती सदस्य छेलबिहारी अग्रवाल, सूरज नशिने, दिव्या भगत-पारधी, हरीश अग्रवाल, डीआरयूसी सदस्य गुड्डू चांदवानी, लक्ष्मण लधानी, भेलूमन गोपलानी, राजेंद्र कावळे, स्मिता शरणागत प्रामुख्याने उपस्थित होते.