लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चीनमधून झपाट्याने प्रसार होत असलेल्या कोरोना व्हायरस प्रती नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शासन तसेच प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती केली जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे निर्देश शासनाने संबंधित विभागाना दिले आहे. मात्र गोंदिया रेल्वे स्थानक व्यवस्थापनाला याचा पूर्णपणे विसर पडला आहे. कोरोना व्हायरस प्रती जनजागृती केली जात नसून साधी उद्घोषणा सुध्दा केली जात नसल्याचे चित्र आहे.कोरोनाचे भारतात संशयीत रुग्ण आढळल्यानंतर शासन आणि प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. ३ मार्चला रेल्वे महाव्यवस्थापकांनी गोंदिया रेल्वे स्टेशन मास्टर यांना पत्र देऊन रेल्वे स्थानकावर कोरोनाची जनजागृती करण्यासाठी पोस्टर, बॅनर लावण्याचे तसेच उद्घोषणा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र याला ७ दिवसांचा कालावधी लोटूनही येथील रेल्वे प्रशासनाने यासंबंधी कुठलीच दक्षता घेतलेली नाही. गोंदिया रेल्वे स्थानक हे हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजार प्रवासी ये-जा करतात. तसेच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांची सीमा लागून असल्याने येथे प्रवाशांची सतत वर्दळ असते. त्यातच कोरोना आजाराप्रती काही अफवासुध्दा नागिरकांमध्ये पसरविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रेल्वे विभागाने उपाय योजना आणि या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याची माहिती रेल्वे स्थानकावर प्रवाशांना देणे गरजेचे आहे.शिवाय उद्घोषणा करूनही जनजागृती करता येते. मात्र याकडे रेल्वे स्टेशन व्यवस्थापनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून कोरोना प्रती रेल्वे प्रशासन बिनधास्त असल्याचे चित्र आहे.
कोरोनाप्रती रेल्वेस्थानक प्रशासन बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST
कोरोनाचे भारतात संशयीत रुग्ण आढळल्यानंतर शासन आणि प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. ३ मार्चला रेल्वे महाव्यवस्थापकांनी गोंदिया रेल्वे स्टेशन मास्टर यांना पत्र देऊन रेल्वे स्थानकावर कोरोनाची जनजागृती करण्यासाठी पोस्टर, बॅनर लावण्याचे तसेच उद्घोषणा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र याला ७ दिवसांचा कालावधी लोटूनही येथील रेल्वे प्रशासनाने यासंबंधी कुठलीच दक्षता घेतलेली नाही.
कोरोनाप्रती रेल्वेस्थानक प्रशासन बिनधास्त
ठळक मुद्देजनजागृती व उद्घोषणेचा विसर : दररोज २५ हजार प्रवाशांची वर्दळ