शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाळेची मान्यता त्वरीत रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश देण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून शालेय प्रशासनाला प्राप्त होते. मात्र, येथील जेएमव्ही शाळेत विराज पृथ्वीराज रामटेके या विद्यार्थ्याचा आरटीई अंतर्गत प्रवेश असून सुद्धा त्याच्या पालकांकडून १६ हजार ४०० रूपये शिक्षण शुल्क घेण्यात आले.

ठळक मुद्देएनएसयुआयची मागणी : जेएमव्ही शाळेसमोर केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण घेता यावे, या अनुषंगाने आरटीई अंतर्गत शासनामार्फत शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, येथील जेएमव्ही शाळा प्रशासनाने आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अवैधरित्या शिक्षण शुल्क आकारणी करून वसुली केली. याबाबतची तक्रार केली असता झालेली चुकही शालेय प्रशासनाने मान्य केली. मात्र, या प्रकरणाला घेवून शिक्षण विभागाने कसलीही कारवाई न केल्याने एनएसयुआयच्यावतीने जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांच्या नेतृत्वात बुधवारी जेएमव्ही शाळेसमोर निदर्शने करण्यात आले.आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश देण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून शालेय प्रशासनाला प्राप्त होते. मात्र, येथील जेएमव्ही शाळेत विराज पृथ्वीराज रामटेके या विद्यार्थ्याचा आरटीई अंतर्गत प्रवेश असून सुद्धा त्याच्या पालकांकडून १६ हजार ४०० रूपये शिक्षण शुल्क घेण्यात आले.दरम्यान शासनाकडून शिक्षण शुल्क प्राप्त झाल्यावर त्यातील निम्न रक्कम परत करण्यात आली. या बाबीची तक्रार पालकांनी केली असता दखल घेत एनएसयुआयच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे जेएमव्ही शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शालेय प्रशासनाला खुलासा मागितला असता त्यांनी माहिती नसल्याने चूक झाल्याची कबूली दिली. एवढेच नव्हे तर यापुढे अशी चुक करणार नाही, असेही लेखी आश्वासन दिले. मात्र शिक्षण विभागाकडून संबंधित शाळा प्रशासनावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान शालेय प्रशासनाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, आरटीई अंतर्गत केलेल्या शिक्षण शुल्क नावावर केलेल्या घोटाळ््याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती.या आंदोलनात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर, युवक कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Schoolशाळा