शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

अव्यवस्थांवर त्वरित अंकुश लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 01:57 IST

येथील केटीएस रूग्णालयातील अव्यवस्थांना बघता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२५)

गोपालदास अग्रवाल : केटीएस रूग्णालयाची केली पाहणी गोंदिया : येथील केटीएस रूग्णालयातील अव्यवस्थांना बघता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२५) केटीएस रूग्णालयाची पाहणी करीत रूग्णालयातील अव्यवस्थांवर त्वरीत अंकूश लावण्याचे निर्देश रूग्णालयाचे डीन डॉ. अजय केवलिया यांना दिले. पाहणीत आमदार अग्रवाल यांनी, उन्हाच्या तडाख्यामुळे रूग्णांचे हाल होत असून रूग्णालयात थंड पेयजल व सर्वच वॉर्डांत कुलरची व्यवस्था करण्याचे निर्देश डॉ. केवलिया यांना दिले. तसेच रूग्णालयात औषधींचा साठा करण्याचे निर्देश देत मागील वर्ष भरापासून बंद पडून असलेल्या सिटी स्कॅन मशीनच्या विषयाला घेऊन आरोग्य विभागाच्या गैरजबाबदार व्यवहारावर नाराजगी व्यक्त केली. यावर डीन डॉ. केवलिया यांनी मशीन दुरूस्तीचे मागील वर्षाचे सुमारे १० लाख रूपयांचे पेमेंट थकून असल्याने संबंधीत कंपनी मशीन दुरू स्तीसाठी कचरत असल्याचे सांगीतले. तर या विषयाला घेऊन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या दौऱ्यात त्यांना माहिती दिली होती. मात्र आरोग्य मंत्र्यांच्या आश्वासना नंतरही पेमेंटमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगीतले. संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून आमदार अग्रवाल यांनी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. वीजय सतबीर सिंग यांच्याशी फोनवर चर्चा करून त्वरीत कारवाईची मागणी केली. तसेच सिटी स्कॅन मशीन दुरूस्ती त्वरीत करता यावी यासाठी मुंबई विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात आरोग्य सचिव डॉ. वीजय सतबीर सिंग, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सिटी स्कॅन मशीन दुरूस्तीसाठी कंपनीचे प्रतिनीधी यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या दौऱ्यात आमदार अग्रवाल यांच्यासोबत कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, नगरसेवक शकील मंसूरी, राकेश ठाकूर, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, देवा रूसे, मंटू पुरोहीत, पराग अग्रवाल, सुशिल रहांगडाले, दिल्लू गुप्ता, व्यंकट पाथरू, सुनिल तिवारी, बलजीतसिंह बग्गा प्रामुख्याने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)