जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना शाळेत क्वारंटाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:35+5:30

नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.

Quarantine the school for those coming from outside the district | जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना शाळेत क्वारंटाईन करा

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना शाळेत क्वारंटाईन करा

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : संसर्ग टाळण्यासाठी उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर बाहेर राज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर आता आपल्या स्वगृही परतत आहे. त्यामुळे गावांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. गावात बाहेर जिल्ह्यातून येणाºया मजुरांना शाळेत क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.
नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.
त्यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत १४ दिवस क्वारंटाईन करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. इतर शेजारी जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून येणाºया गावकºयांना गावाबाहेरील शाळा, अंगणवाडी, वसतिगृहात १४ दिवस क्वारंटाईन करुन ठेवण्यात येते. मग ग्रामीण भागातच वेगळा नियम कशासाठी लागू केला जातो असा प्रश्न निर्माण केला जात आहे.
बाहेरून येणाºयांना १४ दिवस क्वारंटाईन राहा, घरा बाहेर फिरू नका, घरीच रहा, असे कितीही सांगितले तरी ते फिरतातच. याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. म्हणून बाहेरून गावात येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत क्वारंटाईन करुन ठेवावे अशी मागणी गावकºयांकडून केली जात आहे.
याकडे स्थानिक प्रशासनाने आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी नवेगावबांध येथील गावकºयांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात बी.ए.डी विद्यालय नवेगावबांध व मालीनीताई एस. दहीवले आश्रमशाळा एरंडी येथे १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी बाहेरून येणाºया नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे. अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

Web Title: Quarantine the school for those coming from outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.