शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांशी संवाद साधूनच तंमुसचे गुणदान करा- कटारे

By admin | Updated: May 31, 2014 23:35 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या गावांचे मूल्यमापन करतांना सोडविलेल्या तंट्याचे अवलोकन करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याचे अनेक समित्या सांगतात.

गोंदिया :  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या गावांचे मूल्यमापन करतांना सोडविलेल्या तंट्याचे अवलोकन करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याचे अनेक समित्या सांगतात. मात्र या प्रतिबंधात्मक उपाय योजना गावात खरोखरच राबविल्या जातात किंवा नाही याची शहानिशा समितीच्या सदस्यांनी गावकर्‍यांकडून करुन घ्यावी, त्यानंतरच त्या गावाला गुणदान करावे, असे तंटामुक्तीचे समन्वयक किशोर कटारे यांनी सांगितले. पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया सभागृहात गोंदिया जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात गठीत करण्यात आलेल्या बाह्य जिल्हा मूल्यमापन समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी समितीतील सदस्यांना तंटामुक्त मोहीमेच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन कोणत्या आधारावर करावे, यासंदर्भात मार्गदर्शन कटारे यांच्याकडून करण्यात आले. मूल्यमापन समितीने कसल्याही आमिषाला बळी न पडता सोडविलेल्या तंट्याना शासन निर्णयाच्या आधारावरच करावे. तंटे सोडविण्यासाठी नोंदवहीत नोंद केली. त्यांना गुणदान करता येणार नाही. दाखल केलेले तंटे सोडविले असल्यास त्यांनाच गुणदान करावे असे सूचविण्यात आले. यावेळी कोणत्या तंट्याना किती गुण द्यावे, यासंबधी असलेल्या माहितीचे पत्रकही या समितीच्या सदस्यांना देण्यात आले. या प्रशिक्षणाला गोंदिया समितीचे अध्यक्ष तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सरकारी वकील पी.एस. तिरपुडे, पं.स. सभापती सरिता अंबुले व संतोष शर्मा, आमगाव तालुक्याचे तहसीलदार राजीव शक्करवार, पोलीस निरीक्षक बारीकराव मडावी, सरकारी वकील वाय.एस. राऊत, सभापती हनुवंत वट्टी, व दिपक शर्मा, तिरोडा तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक, पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, सरकारी वकील एच.पी. रणदिवे, सभापती ललीता जांभूळकर, प्रदीप तापणकर, गोरेगाव तालुक्याचे तहसीलदार डी.ए.सपाटे, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, सरकारी वकील कु.एस.आर. तिवारी, सभापती चित्रकला चौधरी, प्रमोद नागनाथे, सालेकसाचे तहसीलदार जी.एन.खापेकर, पोलीस निरीक्षक एस.पी. रणदिवे, सरकारी वकील प्रदीप सेंगरे, सभापती छाया बल्हारे व सागर काटेखाये, देवरीचे तहसीलदार रविंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक संजू जॉन, सरकारी वकील एस.एन.जैन, सभापती कामेश्‍वर निकोडे व देवेंद्र सेलोकर, सडक/अर्जुनीचे तहसीलदार एन.जी.उईके, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सरकारी वकील पी.एस.आगाशे, सभापती निर्मला उईके व निषांत राऊत उपस्थित होते. या समितीतील सदस्यांना तंटमुक्त मोहीमेसंदर्भातील सर्व नोंदवह्यांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील चमू बाह्य मुल्यमपनासठी जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)