शेतकऱ्यांना २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मिळवून दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:58 IST2017-07-25T00:58:16+5:302017-07-25T00:58:16+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील आपादग्रस्त शेतकरी नियमात बसत नसताना ...

शेतकऱ्यांना २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मिळवून दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील आपादग्रस्त शेतकरी नियमात बसत नसताना त्यांना २ कोटी ७० लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून मिळवून दिली. ज्या सरकारची सत्ता आहे. त्याच सरकारचे नेते धानाला ३ हजार रुपये भाव द्या, अशी मागणी करतात. परंतु त्याच्या मदतीसाठी पुढे येत नाही. अशी खंत आ. गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केली.
तालुक्याच्या रावणवाडी येथील आयोजित रोग निदान शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.सदस्य विजय लोणारे, पं.स.सदस्य माधुरी हरिणखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, गेंदलाल शरणागत, अंकेश हरिणखेडे, प्रकाश डहाट, नितीन तुरकर, सावलराम महारवाडे, संतोष घरसेले, सरपंच मिना लिल्हारे, किशोर वासनिक, राजेंद्र कटरे, सुनिल राऊत, महेंद्र घोडीस्वार, राधेश्याम पटले, गमचंद तुरकर उपस्थित होते.