उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:21 IST2018-09-30T22:20:02+5:302018-09-30T22:21:52+5:30

योग्य उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू झाला. तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथील ही महिला असून शनिवारी (दि.२९) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे सोनपुरीवासी चांगलेच संतापले होते.

Pregnancy death due to lack of treatment | उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू

उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू

ठळक मुद्देसोनपुरी येथील घटना : गावकऱ्यांनी ठेवला मृतदेह उपकेंद्राच्या दारात

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : योग्य उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू झाला. तालुक्यातील ग्राम सोनपुरी येथील ही महिला असून शनिवारी (दि.२९) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे सोनपुरीवासी चांगलेच संतापले होते.
यामुळे त्यांनी रविवारी (दि.३०) महिलेचा मृतदेह गावातील आरोग्य उपकेंद्राच्या दारात ठेवून दोषींवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे गावातील वातावरण चांगलेच चिघळले होते. अखेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे प्रकरण शांत झाले.
गीताबाई महारू पंधरे (३०,रा.सोनपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. सविस्तर असे की, गीताबाई यांना शनिवारी (दि.२९) पहाटे प्रसुती वेदना सुरू झाल्याने घरच्यांनी त्यांना सकाळी ६ वाजतादरम्यान गावातील आरोग्य उपकेंद्रात भर्ती केले. मात्र उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी खोब्रागडे गैरहजर असतानाही आरोग्य सेविता माधुरी गजभिये यांनी गीताबाईला थांबवून ठेवले व दुपारी ३ वाजता सालेकसा ग्रामीण रूग्णालयात रेफर केले. यावर घरच्यांनी त्यांना सालेकसा येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना गोंदियाला रेफर केले.
दरम्यान सायंकाळी सुमारे ४ वाजतादरम्यान गीताबाईंना घेऊन घरचे लोक गोंदियासाठी निघाले. मात्र सुमारे आठ-दहा तासांचा कालावधी व्यर्थ गेल्याने वाटेतच गीताबाईंची प्रकृती गंभीर झाली व अदासी व गावाजवळ त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर सोबतच त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. गोंदियातील रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी गीताबाईंना मृत घोषीत केले. तसेच रात्री मृतदेह तेथेच ठेवला व रविवारी (दि.३०) सकाळी उत्तरीय तपासणी करून घरच्यांना दिला.
मात्र या घटनेमुळे घरचे व गावकरी चांगलेच खवळले होते व त्यांनी सकाळी ११ वाजतादरम्यान मृतदेह गावातील आरोग्य उपकेंद्राच्या दारात ठेवून दोषींवर कारवाई होत पर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची मागणी केली. विशेष म्हणजे, याप्रसंगी उपकेंद्रात कुणीही नसल्याने गावकरी आणखीच खवळले होते.
याबाबत माहिती मिळताच सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजकुमार डुणगे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना बोलावून घेतले. त्यानुसार, तालुका आरोग्य अधिकारी गगन गुप्ता, वैद्यकीय अधिकारी राजू रघटाटे व स्थानिक डॉक्टर अमर खोब्रागडे घटनास्थळी आले.
यावेळी सरपंच संगीता कुराहे यांनी अरोग्य सेविका माधुरी गजभिये व ममता खोब्रागडे योग्यरित्या आरोग्य सेवा देत नसल्याचे सांगीतले.
तसेच उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे यांना बनगाव आरोग्य केंद्राची जबाबदारी दिली असल्याने ते एक-दोन दिवसच येत असल्याचे सांगत येथील व्यवस्थेत सुधारणा करा किंवा उपकेंद्र बंद करा अशी मागणी सरपंच कुराहे व गावकऱ्यांनी केली.

लेखी आश्वासनानंतर प्रकरण थंडावले
गावातील घटनेमुळे संतापलेल्या गावकºयांना पोलिसांनी नियंत्रणात आणले अन्यथा कोणतीही अप्रिय घटना घडली असती. दोषींवर कारवाई करा अशी मागणी गावकरी करू लागले होते. मात्र त्यातही लेखी आश्वासन द्या तेव्हाच मृतदेह उचलू या भूमिकेवर गावकरी अडून असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी गुप्ता यांनी दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सुमारे ४.३० वाजतादरम्यान गावकºयांनी मृतदेह उचलला.

या उपकेंद्रात दोन आरोग्य सेविका असून एक नेहमी बाहेरून ये-जा करते. तर दुसरी वेळेवर उपचार देण्यात तयार नसले. तसेच डॉक्टर नियमित राहत नसल्याने योग्य उपचार मिळत नाही. या समस्या आरोग्य विभागाने तातडीने दूर कराव्या.
- संगीता कुराहे, सरपंच, सोनपुरी

डॉ. खोब्रागडे यांना आजपासून सोनपुरी उपकेंद्रावर सातही दिवस नियमित करण्यात येत आहे. तसेच दोषी आढळल्यास आरोग्य सेविकेवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
- गगन गुप्ता तालुका वैद्यकीय अधिकारी, सालेकसा.

Web Title: Pregnancy death due to lack of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.