शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

झटू सर्व भावे, करू स्वर्ग गावा..!

By admin | Updated: June 8, 2014 00:00 IST

आदर्श गावाची संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, पारंपरिक चालिरीतींना त्यागून विज्ञानवादी दृष्टिकोनातून गावाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा

गुरूदेव सेवक ठाकूर गुरूजी : २३0 गावांत सेवा मंडळाच्या शाखा स्थापन
नरेश रहिले - गोंदिया
आदर्श गावाची संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडली. अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी, पारंपरिक चालिरीतींना त्यागून विज्ञानवादी दृष्टिकोनातून गावाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा उत्तम मार्ग ग्रामगीतेतून सांगितला. या ग्रामगीतेची वाणी प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी ६८ व्या वर्षीही ठाकूर गुरूजी तेवढय़ाच उत्साहाने धडपडत आहेत. नि:स्वार्थपणे पुढील पिढीवर योग्य संस्कार घडविण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्याच तोंडून जाणून जाणून घेतलेली ही माहिती.
गोंदियातील जे.एम. हायस्कूल सिव्हील लाईन शाखेत शिक्षक म्हणून ठाकूर गुरूजींनी काम केले. शिक्षण क्षेत्रात काम करताना विद्यार्थी घडविणे, त्यांना आदर्श नागरिक बनविणे हा त्यांचा स्वभावगुण होता. विद्यार्थ्याना आदर्श नागरिक घडविण्याच्या  तळमळीतूनच त्यांनी सेवानवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतले.
‘तन-मन से गाऊंगा तेरा भजन, ऊँचा उठा दे मेरा प्यारा वतन,’ हे राष्ट्रसंतांचे भजन गात गावागावांत गुरूदेव सेवा मंडळाच्या शाखा स्थापन करण्यावर जोर दिला. नोकरी पेशा करणारे व्यक्ती सेवानवृत्तीनंतर आराम करण्यास पसंत करतात. मात्र ‘आराम हराम है’ या युक्तीला अंगीकारून त्यांनी  समाजकार्यात वाहून घेतले. याबद्दल सांगताना ते म्हणतात, सेवाभावातूनच ईश्‍वर भक्ती होते.
राष्ट्रसंतांचा विज्ञानवादी दृष्टिकोन पुढे ठेवून भजनाच्या माध्यमातून गावागावात राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा अर्थबोध समाजाला करवून देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. लोकांनी यावे, गुरूदेव सेव मंडळाशी जुळाले आणि त्यांचे तत्व अंगीकाराने असा प्रयत्न असतो. अनेकांना हे पटते. त्यातूनच जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा अधिक लोकांना गुरूदेव सेवा मंडळाशी जुळवण्यात यश आल्याचे गुरूजींनी सांगितले.
सद्यस्थितीत समाजात दारू, जुगार, खर्रा, गुटखा, तंबाखू अशी वाईट व्यसने समाजाला लागली आहेत. या व्यसनामुळे येणारी पिढी नैराश्याच्या खाईत लोटत चालली आहे. त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी व सन्मार्गाला लागण्यासाठी तुकडोजी महाराजांनी लिहीलेल्या भजनांचा आधार घेत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महिलांच्या शोषणावर आवाज उठविताना हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार यावर प्रबोधन करीत हुंडा देऊ नका, मागू नका, स्त्रीयांचा सन्मान करा अशी आर्त हाक ते समाजाला देत आहेत. त्यासाठी ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी नमुद केलेल्या ओव्यांमधून ते समाजाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरुणांनी आळशी न होता, आणि उच्च शिक्षणाचा आव न दाखविता आपल्या शेतीला पडीक ठेऊ नये. उच्च शिक्षण घेऊनही शेतीत नांगर पकडायची लाज वाटू देऊ नका, गोपालन करा असे ठाकूर गुरूज सांगतात. शेतीच्या कामाकडे हल्ली दुर्लक्ष करण्यात आले. शेतीच्या कामात करावी लागणारी मेहनत आजच्या तरूणांना परवडण्यासारखी वाटत नसल्याने शेतीसाठी मानसे मिळत नाही.  त्या शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यागेल्याने बेरोजगारीत वाढ झाली. शेती न पिकविता मजूरीसाठी शहरात पलायन करणार्‍या मजूरांना राष्ट्रसंताच्या भजनाची आठवण करून दिली. ‘सोन्यासारखी जमीन सगळी, परंतु राबे ना कोणी, उटला सुटला नोकर होतो, पैश्यासाठी लोभानी’ ही परिस्थिती समाजाची असल्याचे ते म्हणाले.मी नवव्या वर्गात असताना आमगावच्या गुरूदेव टेकडीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते. त्यांच्या कीर्तनाने माझे अंतरंग बदलले. त्यानंतर मी वंदनीय महाराजांच्या ‘लहरकी बरखा’ या पुस्तकातील २५0 श्लोक पाठांतर केले. त्या ोकांचा वक्तृत्वात भर पाडण्यास मदत झाली. आपल्या पेंशनमधील महिन्याकाठी ३ हजार रूपये राष्ट्रसंताच्या प्रचारासाठी आता खर्च करीत आहे. माझे चित्त, देह, भान राष्ट्रसंताच्या साहित्याच्या प्रचारासाठी आहे. त्यांच्या ग्रामगीतेतून आदर्श गावाची संकल्पना राबविण्यास आता महाराष्ट्र शासनही सरसावले, याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.
‘खरे काम निष्काम ही ग्रामसेवा,
झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा,
कळो हे वळो देह कार्यी पडू दे,
घडू दे प्रभू, एवढे हे घडू दे’
हे लक्षात ठेवून आपण गावाला स्वर्गासारखे करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ठाकूर गुरूजी म्हणाले.