प्रफुल्ल पटेल दोेन दिवस जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:03 AM2018-02-13T00:03:55+5:302018-02-13T00:04:13+5:30

खा. प्रफुल्ल पटेल १३ व १४ फेब्रुवारीला जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त गायमुख (ता. तुमसर) येथे आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (दि.१३) सकाळी ११.४५ वाजता उपस्थित राहतील.

Praful Patel in Two days district | प्रफुल्ल पटेल दोेन दिवस जिल्ह्यात

प्रफुल्ल पटेल दोेन दिवस जिल्ह्यात

Next

गोंदिया : खा. प्रफुल्ल पटेल १३ व १४ फेब्रुवारीला जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त गायमुख (ता. तुमसर) येथे आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (दि.१३) सकाळी ११.४५ वाजता उपस्थित राहतील. तसेच इतर शिव मंदिरांना भेट देवून दर्शन घेतील. गायमुख तसेच प्रतापगड येथे मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीद्वारे दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रतापगड येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर आयोजित कार्यक्रमात व महाप्रसाद कार्यक्रमात अ‍ॅकडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित राहतील. खा. पटेल बुधवारी (दि.१४) दुपारी १ वाजता गोंदियाच्या जैन कलार समाज सांस्कृतिक भवन, पिंडकेपार रोड येथे जैन कलार समाजाद्वारे आयोजित महिला मेळावा, स्रेहसंमेलन व लोकार्पण कार्यक्रमात उपस्थित राहतील. जैन कलार समाज भवनाच्या बांधकामासाठी पटेलांच्या खासदार निधीतून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यानंतर खा. पटेल दुपारी ३ वाजता साकोलीकडे प्रस्थान करतील.

Web Title: Praful Patel in Two days district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.