शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कोहळीपार तलावाची पाळ फुटण्याची शक्यता

By admin | Updated: August 10, 2014 23:05 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील ६५ एकर जमिनीत एक मोठा तलाव आहे. वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत त्या पाळीला पाण्याने खुरपत नेल्यामुळे तलावाची पाळ फुटून मोठा

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहळीपार (शेंडा) येथील ६५ एकर जमिनीत एक मोठा तलाव आहे. वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत त्या पाळीला पाण्याने खुरपत नेल्यामुळे तलावाची पाळ फुटून मोठा घात होण्याची भीती आहे. शेतातील धानपीक तसेच लागून असलेल्या कोयलारी, प्रधानटोला व सालेधाटणी हे गावे पाण्याखाली येण्याची दाट शक्यता असल्यामुळे गावकरी धास्तावले आहेत. जिल्हा परिषद गोंदिया लघु पाटबंधारे उपविभाग आमगावतर्फे सन १९९४ मध्ये कोहळीपार शिवारात जंगलाला लागून ६५ एकर जमिनीवर या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. कमीत कमी ५०० एकर जमिनीला सिंचनाची सोय होईल, हे उद्दिष्ट होते. कास्तकारांना पाणी पुरवठा करण्यासाठी नहरसुध्दा तयार करण्यात आला आहे. परंतु या विस वर्षाच्या काळात त्या नहराची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे तो बुजला व तलावातील पाणी नहराव्दारे न जाता जवळील कास्तकारांच्या शेतातून वाहते. त्यामुळे धानपिकाचे त्याचप्रमाणे ऊस व तूर यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान होते. जंगल परिसरात हा तलाव असल्यामुळे पाण्याचा साठा मोठा प्रमाणात होते. त्यामुळे वेस्ट वेअरमधून लवकरच पाणी वाहायला सुरूवात होते. अशातच वेस्ट वेअरपासून २५ फुटापर्यंत पाण्याने तलावाच्या पारीला खुरपत नेले आहे. त्यामुळे केव्हाही पार फुटून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच तलावाला लागून कोयलारी गावतलाव आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने त्या तलावाच्या पाळीला मधोमध खड्डा पडून जोरजोराने पाणी वाहत होते. गावकऱ्यांच्या दक्षतेमुळे वेळीच उपाययोजना करण्यात आली व हानी टळली. त्याचप्रमाणे नजीकच असलेल्या पुतळी येथील तलावाची पाळ फुटून शेकडो एकर जमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी कोयलारी येथील ह.भ.प. बळीराम पाथोडे, टिकाराम बडोले व सरपंच हिरालाल मेश्राम यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने जि.प. पाटबंधारे विभाग गोंदिया, लघु पाटबंधारे उपविभाग आमगाव व तहसीलदार सडक/अर्जुनी यांना लेखी निवेदनातून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. परंतु एकही अधिकारी फिरकला नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित विभागाने पावसाळा संपताच वेस्ट वेअरची जागा बदलावी. त्याचप्रमाणे नहराची (पाटाची) सफाई अविलंब करावी जेणेकरून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत नहराचे पाणी पोहचू शकेल. (वार्ताहर)