निकृष्ट दर्जाचे काळे खांब, त्यावर अल्पशा सिमेंटचा थर; नवेगावबांध-सानगडी विद्युत लाइन प्रकल्पात मोठा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:31 IST2025-10-01T19:30:35+5:302025-10-01T19:31:18+5:30

Gondia : विद्युत विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार हातात हात घालून केंद्र सरकारच्या निधीचा गैरवापर करत असल्याचे गंभीर आरोप

Poor quality black poles, with a thin layer of cement on them; a big mess in the Navegaon Bandh-Sangadi power line project | निकृष्ट दर्जाचे काळे खांब, त्यावर अल्पशा सिमेंटचा थर; नवेगावबांध-सानगडी विद्युत लाइन प्रकल्पात मोठा घोळ

Poor quality black poles, with a thin layer of cement on them; a big mess in the Navegaon Bandh-Sangadi power line project

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध :
झिरो ब्रेकडाऊन पॉलिसी अंतर्गत केंद्र सरकारच्या योजनेतून सुरू असलेल्या नवेगावबांध-सानगडी विद्युत लाइनच्या कामात प्रचंड अनियमितता होत असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने होल्टेज ड्राफ्ट कव्हर करण्यासाठी आणि अखंडित वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने हे काम मंजूर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याची ओरड सुरू आहे.

सध्या नवेगावबांध सर्कलमधील भिवखिडकी, बाराभाटी, परसोडी, झाशीनगर या गावांमध्ये विद्युत लाइनचे काम सुरू आहे. नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. गोंदिया जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष किशोर तरोने यांनी आक्षेप घेतला आहे. विद्युत विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार हातात हात घालून केंद्र सरकारच्या निधीचा गैरवापर करत आहेत. नियमानुसार जंगरोधक लोखंडी खांब असायला हवेत; मात्र त्याऐवजी निकृष्ट दर्जाचे काळे लोखंडी खांब लावले जात आहेत. त्यांना योग्य रेड ऑक्साइड, सिल्व्हर रंग न लावता अल्पशा सिमेंट काँक्रीटमध्ये उभे केले जात आहे. हा सरळसरळ जनतेच्या पैशाचा अपव्यय असून, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

चौकशी करून कारवाई करा

केंद्र सरकारचा निधी आणि मार्गदर्शक तत्त्वे असतानाही काम निकृष्ट दर्जाचे का चालले आहे? अधिकारी, कंत्राटदार आणि कंपनी यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासनाने या कामाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

नियमानुसारच काम सुरू

कामाचे प्रत्यक्ष प्रभारी अधिकारी असलेले पॉलीकॅब कंपनी गोंदिया सर्कलचे प्रभारी लोकेश दादोरिया यांनी सांगितले की रस्त्याच्या बाजूला शेतजमीन असल्याने शेतकरी पूर्ण शिफ्ट देत नाहीत. त्यामुळे खांब आम्ही रोडच्या मध्यभागातून ४, ५ किंवा ६ मीटर अंतर ठेवून बसवतो. मटेरियल एम. एस असून, रेड ऑक्साइड लावले जात आहे. केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार झिरो ब्रेकडाऊन पॉलिसी अंतर्गत होल्टेज ड्राफ्ट कव्हर करण्यासाठी हे काम सुरू आहे.

"प्रकल्पात जे नमूद असेल त्याप्रमाणेच काम होतं. लोखंडी खांबाचा समावेश असेल तर तेच बसविले जातात. १० ते ११ मीटरचे पोल ४ ते ५ फूट खोलीपर्यंत गाडून रेड ऑक्साइड व सिल्व्हर रंग लावून काँक्रीटने मजबुती दिली जाते. सर्व काम आमच्या देखरेखीखालीच होतं. जंगरोधक लोखंडी खांब असणे आवश्यक नाही, प्रकल्पात नमूद असेल तरच तेच खांब वापरण्यात येतील."
- डी. एस. पाटील, उपकार्यकारी अभियंता महावितरण अर्जुनी मोरगाव

Web Title : निकृष्ट खंभे, पतला सीमेंट: नवेगांवबांध-सानगडी बिजली लाइन परियोजना में भ्रष्टाचार।

Web Summary : नवेगांवबांध-सानगडी बिजली लाइन कार्य में भ्रष्टाचार के आरोप लगे हैं। घटिया खंभों का उपयोग किया जा रहा है, सीमेंट कम है। स्थानीय लोगों ने केंद्रीय धन के दुरुपयोग की जांच की मांग की है।

Web Title : Substandard poles, thin cement: Corruption in Navegaonbandh-Sanagadi power line project.

Web Summary : Navegaonbandh-Sanagadi power line work faces corruption allegations. Substandard poles are being used with minimal cement. Locals demand investigation into misuse of central funds.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.