पोलीस दलातर्फे गरजुंना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:20+5:30

पांढरवाणी गावात गडचिरोली परिक्षेत्राचे डीआयजी तांंबडे व जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील गरजू लोकांना ब्लाँकेट आणि पाणी शुद्धीकरण बॉटल वाटप करण्यात आले.यावेळी सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे, बिजेपार एओपीचे प्रभारी जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक कावडे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Police force distributes material to needy | पोलीस दलातर्फे गरजुंना साहित्य वाटप

पोलीस दलातर्फे गरजुंना साहित्य वाटप

ठळक मुद्देनक्षलग्रस्त भागात जनजागृती मोहीम : मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागातील सशस्त्र दूरक्षेत्र बिजेपार अंतर्गत पांढरवाणी गावात गडचिरोली परिक्षेत्राचे डीआयजी तांंबडे व जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील गरजू लोकांना ब्लाँकेट आणि पाणी शुद्धीकरण बॉटल वाटप करण्यात आले.यावेळी सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे, बिजेपार एओपीचे प्रभारी जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक कावडे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी तांबडे यांनी, आपल्याला आपल्या भावी पिढी व आपला विकास साधायचा असेल तर नक्षलवादी चळवळीपासून दूर राहावे लागेल. जेणेकरुन आपल्याला जास्तीतजास्त विकास करता येईल व एक स्वच्छ विकसित समाजाची निर्मिती करता येईल. विकास वाटेवर पुढे जाण्यासाठी आपल्या मुला-मुलींना वाम मार्गावर जाण्यास थांबवून दर्जेदार शिक्षण कसे मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगीतले. यावेळी त्यांनी जनतेच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला व त्या दूर करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्याचे आवश्वासन दिले.
शिंदे यांनी, ग्रामीण युवकांनी पोलीस दलात भरती व्हावे व समाज सेवा आणि देश सेवा करण्याचे कार्य करावे असे मत व्यक्त केले. जिल्ह्यातील प्रत्येक नक्षलग्रस्त गावामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी कसे मिळेल, पुरेशी खाद्यान्न व्यवस्था प्रत्येक गरजूच्या घरापर्यंत कशी पोहोचेल यासाठी संबंधित विभागाशी समन्वयक साधून प्रयत्न केले जाईल व लोकांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचे सुद्धा आश्वासन दिले. कार्यक्रमाचे औचित्य साधून खातीटोला, पांढरवाणी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सामने बघण्यासाठी गावातील व परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विजेत्या व उपविजेत्या संघाला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस दलाच्या या सर्व उपक्रमांना स्थानिक लोकांकडून उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी ठाणेदार डुणगे यांच्या मार्गदर्शनात सशस्त्र दूर क्षेत्र बिजेपार येथील जवानांनी सहकार्य केले.

Web Title: Police force distributes material to needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.